ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत आहे इतकी एकनिष्ठ, हा आहे मोठा पुरावा

अभिनेत्री ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले होते. यानंतर 16 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अभिषेक बच्चनचं नाव अभिनेत्र निमरत कौरसोबत सोडलं जात होतं. या सगळ्यादरम्यान अलीकडेच अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक बच्चनसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये आराध्या बच्चनही दिसली होती. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभिषेकपासून वेगळं झाल्याच्या चर्चा एकीकडे सुरु असताना ऐश्वर्या रायचं इन्स्टाग्राम अकाऊंट चर्चेत आलं आहे. ऐश्वर्या अजूनही अभिषेकला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. 14.3 मिलियन फॉलोअर्स असलेली ऐश्वर्या राय इंस्टाग्रामवर फक्त एका व्यक्तीला फॉलो करते, ती म्हणजे अभिषेक बच्चन. त्यामुळे दोघांचं नातं अजूनही टीकून असल्याचं दिसून येत आहे.

(नक्की वाचा- अभिषेकसोबतच्या नात्याच्या अफवांवर निमरतची पहिलीच प्रतिक्रिया - हे सगळं रोखणं माझ्या हातात नाही)

त्याआधी अभिषेक बच्चनसोबत नाव जोडल्याच्या अफवांवर निमरत कौरने भाष्य केलं आहे. “लोक त्यांना जे बोलायचे आहे तेच बोलतील. मी यामध्ये काहीही करु शकत नाही. हे सगळं थांबवणे माझ्या हातात नाही. म्हणूनच मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देतो." 

Advertisement

(नक्की वाचा: Janhvi Kapoor : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण)

अभिनेत्री ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले होते. यानंतर 16 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला. बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे त्यांचे चाहते चिंतीत असून लवकरच दोघाचं नातं सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत.