Abhishek Bachchan And Nimrat Kaur: बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौर (Nimrat Kaur) गेल्या काही दिवसांपासून एका वादामध्ये अडकलेली दिसत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांचे नाते संपुष्टात येण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यामागे निमरत कौर कारण असल्याचे म्हटले जात आहे. 'दसवी' सिनेमापासून निमरत कौर आणि अभिषेक बच्चन रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान 'सिटाडेट हनी बनी' वेबसीरिजच्या स्क्रीनिंग शोमध्ये निमरतने तिचे रिलेशनशिप स्टेटस नेमके काय आहे? याबाबतची माहिती जाहीर केली आहे. तिने दिलेल्या माहितीवर चाहते देखील प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
निमरत कौरचे काय आहे रिलेशनशिप स्टेटस?
झूम चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निमरतने सिंगल असण्याच्या विषयावर सहमती दर्शवली, ज्यावरून अप्रत्यक्षरित्या तिने स्वतः देखील सिंगल असल्याची पुष्टी दिल्याचे अनेकांना वाटत आहे. यावेळेस तिने अविवाहित महिलांना काही टिप्सही दिल्या.
(नक्की वाचा : ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत आहे इतकी एकनिष्ठ, हा आहे मोठा पुरावा)
रिपोर्ट्सनुसार बच्चन कुटुंबीयांनी अभिषेक-निमरतच्या रिलेशनशिपबाबतच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या आणि म्हटले होते की, 'या चर्चांमध्ये मुळीच तथ्य नाही'. दरम्यान अभिषेक बच्चनने या प्रकरणामध्ये मौन बाळगण्याचा निर्णय घेतला कारण त्याला वादांपासून दूर राहण्यास सांगितले होते. दुसरीकडे निमरतनेही या चर्चांवर कोणतेही विधान केलेले नाही.
(नक्की वाचा : अभिषेकसोबतच्या नात्याच्या अफवांवर निमरतची पहिलीच प्रतिक्रिया - हे सगळं रोखणं माझ्या हातात नाही)
दरम्यान काही दिवसांपूर्वी एक मोठ्या कुटुंबातील लग्नसोहळ्यामध्ये बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या रायने एकत्रित उपस्थिती दर्शवली नव्हती. तेव्हापासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यामध्ये काहीही ठीक नसल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. यानंतरही कित्येक कार्यक्रमांमध्ये या दोघांनी एकत्रित हजेरी लावणे टाळले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world