जाहिरात

'या' चित्रपटामुळे अजय देवगणला बसला जोरदार धक्का, 100 कोटीच्या चित्रपटाने कमावले फक्त...

अजय देवगणच्या नावावर असा एक चित्रपट आहे जो सुपर फ्लॉप म्हणून ओळखला जातो. या फ्लॉप चित्रपटामुळे अजय देवगणच्या करिअरलाच मोठा धक्का बसला आहे.

'या' चित्रपटामुळे अजय देवगणला बसला जोरदार धक्का, 100 कोटीच्या चित्रपटाने कमावले फक्त...
मुंबई:

अभिनेता अजय देवगण याची ओळख बॉलिवूडचा सिंघम म्हणून आहे. त्याने बॉलिवूडमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. पण अजय देवगणच्या नावावर असा एक चित्रपट आहे जो सुपर फ्लॉप म्हणून ओळखला जातो. या फ्लॉप चित्रपटामुळे अजय देवगणच्या करिअरलाच मोठा धक्का बसला आहे. या वर्षात अजय देवगणचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातल्या एक चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण दुसऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांना साफ नाकारल. तर तिसरा चित्रपट हा अजयच्या करिअरमधला सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला. चित्रपटासाठी झालेला खर्चही भरून निघाला नाही. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या वर्षी अजय देवगणचे तीन चित्रपट प्रदर्शीत झाले आहेत. त्यातील शैतान हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि आर. माधवन यांची जबरदस्त जुगलबंदी आहे. ती प्रेक्षकांना आवडलीही. या दोघांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र त्यानंतर प्रदर्शित झालेला मैदान हा चित्रपट तेवढासा चालला नाही. मात्र त्यानंतर प्रदर्शित झालेला ‘औरों में कहां दम था' हा चित्रपट सपाटून आपटला. हा अजयच्या करिअर मधला आतापर्यंतचा सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी लावलेले पैसेही निर्मात्याला वसूल करता आले नाहीत. त्याला जवळपास 90 कोटीचं नुकसान उचलावं लागलं.

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहिण योजनेचा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर

‘औरों में कहां दम था' हा चित्रपट नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केला होता. हा एक रोमँटीक थ्रिलरपट होता. या चित्रपटात अजय देवगण बरोबरच तब्बू, शांतनु माहेश्वरी, जिमी शेरगिल आणि सई मांजरेकर होते. प्रदर्शित झाला त्या दिवशी या चित्रपटाची कमाई 1.85 कोटी रुपये होती. तर 12.91 कोटी हे ओव्हरऑल कलेक्शन होते. या चित्रपटासाठी जवळपास 100 कोटी रूपये खर्च झाला होता. पण 2024 मधला हा सर्वात मोठा फ्लॉप ठरला आहे. याचा मोठा फटका निर्मात्यांनाही बसला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - सरपंच-उपसरपंचांसाठी खुश खबर! मानधनात झाली घसघशीत वाढ, आता महिन्याला मिळणार...

अजय देवगणसाठी हा एक मोठा धक्का समजला जातो. असं असलं तरी अजय देवगणकडून मोठ्या अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहेत. अजय देवगणची सिंघम अगेन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याची वाट त्याचे चाहते पाहात आहेत. रोहित शेट्टीचा हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. यामध्ये अजय देवगण बरोबर अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, करीना कपूर, टाइगर श्रॉफ, जैकी श्रॉफ, विक्की कौशल, रणवीर सिंह झळकणार आहे. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
होय मला ती आवडत होती! तिच्यासाठी मी योगा क्लासला जायचो; सलमान खानची कबुली
'या' चित्रपटामुळे अजय देवगणला बसला जोरदार धक्का, 100 कोटीच्या चित्रपटाने कमावले फक्त...
Randeep Hooda Starer Swatantrya Veer Savarkar movie enters Oscars 2025 race
Next Article
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत