Akshay Kumar: हॉटेलमधून बल्ब चोरणारा 'खिलाडी'! अक्षय कुमारने सांगितला संघर्षाच्या काळातील 'तो' मजेशीर किस्सा

अक्षय कुमार आज कोट्यवधींचा मालक असला, तरी त्याचे बालपण सामान्य मुलांप्रमाणेच खोडकर होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अक्षय कुमारने एका कार्यक्रमात बालपणी हॉटेलच्या लिफ्टमधील बल्ब चोरी केल्याचा मजेशीर किस्सा प्रांजळपणे सांगितला
  • आईने दिलेले बल्ब आणण्याचे पैसे वाचवण्यासाठी बल्ब चोरी करून ते स्वतःच्या खिशात टाकले
  • अक्षयने अर्चना पूरण सिंह आणि राजकुमार राव यांच्यासोबत मजेशीर गप्पा मारल्या
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

छोट्या पडद्यावरील 'व्हील ऑफ फॉर्च्यून' या कार्यक्रमात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आपल्या बालपणातील एक अतिशय मजेशीर आणि नॉस्टॅल्जिक आठवण शेअर केली. एका पजल दरम्यान हॉटेलमधून वस्तू चोरण्याचा विषय निघाला, तेव्हा अक्षयने मनाचा मोठेपणा दाखवत आपण लहानपणी केलेल्या एका चोरीची कबुली दिली. अक्षयसोबतच राजकुमार राव, अर्चना पूरण सिंह आणि सान्या मल्होत्रा यांनीही या गप्पांमध्ये चांगलीच रंगत आणली. एका कोड्याचे उत्तर देताना अक्षयने प्रांजळपणे कबूल केले की, लहानपणी तो हॉटेलच्या लिफ्टमधील बल्ब चोरायचा. आईने बल्ब आणण्यासाठी दिलेले पैसे ते स्वत: च्या खिशात टाकायचा. अभिनेता परमीत सेठीसोबत केलेल्या संघर्षाचे दिवसही त्याने यावेळी आठवले.

अक्षयने सांगितले की, जेव्हा तो लहान होता, तेव्हा त्याची आई त्याला घरासाठी बल्ब आणायला पैसे द्यायची. पण ते पैसे वाचवण्यासाठी अक्षय एक नामी शक्कल लढवायचा. जुहू येथील एका नामांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये जाऊन तो तिथले बल्ब चोरून घरी आणायचा. आईने दिलेले पैसे आपल्या खिशात टाकायचा. "मी कापडाने पकडून गुपचूप दोन बल्ब काढायचो आणि घरी घेऊन यायचो. ते पैसे वाचवून मला खूप आनंद व्हायचा," असे अक्षयने हसत हसत सांगितले.

Advertisement

नक्की वाचा - बॉबी देओलसाठी 'हा' व्यक्ती आहे सर्वात महत्त्वाचा! ना धर्मेंद्र, ना सनी, ना आई, घेतलं 'या' खास व्यक्तीचं नाव

यावेळी अक्षयने केवळ मस्तीच केली नाही, तर आपल्या संघर्षाच्या काळातील आठवणींनाही उजाळा दिला. अर्चना पूरण सिंहचा पती परमीत सेठी आणि अक्षयने करिअरच्या सुरुवातीला सोबत स्ट्रगल केला आहे. सुभाष घई यांच्या ऑफिसबाहेर कामासाठी रांगा लावण्यापासून ते 'धडकन' चित्रपटात एकत्र काम करण्यापर्यंतचा प्रवास अक्षयने भावूक होऊन सांगितला. यावेळी अर्चनाने 'मी लोकांची मने चोरली आहेत' असे म्हणताच सेटवर एकच हशा पिकला.

नक्की वाचा - 'हे बेबी'मधील चिमुकली 'एंजेल' आता झालीय ग्लॅमरस 'डिंपल गर्ल'! 18 वर्षांनंतरचा लूक पाहून चाहते थक्क

अक्षय कुमार आज कोट्यवधींचा मालक असला, तरी त्याचे बालपण सामान्य मुलांप्रमाणेच खोडकर होते. याने स्वतःच्या चोरीचा किस्सा सांगितला आहे. अक्षय म्हणाला की, आई जेव्हा घरासाठी बल्ब आणायला पैसे द्यायची, तेव्हा तो पैसे खर्च करण्याऐवजी जुहूतील एका हॉटेलच्या लिफ्टमधले बल्ब काढून आणायचा. ही प्रांजळ कबुली दिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रालाही हसू अनावर झाले. अर्चना पूरण सिंहसोबतची त्याची मज्जा-मस्ती आणि संघर्षाच्या दिवसांतील आठवणींनी हा भाग विशेष ठरला.