जाहिरात

Allu Arjun: अल्लू अर्जुनचा नवा अवतार पाहून चाहते थक्क! 'राका'चा धडकी भरवणारा लूक एकदा पाहाच

हा अवतार सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Allu Arjun: अल्लू अर्जुनचा नवा अवतार पाहून चाहते थक्क! 'राका'चा धडकी भरवणारा लूक एकदा पाहाच
  • अल्लू अर्जुनने आपल्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्या चित्रपटाचे नाव 'राका' जाहीर केले आहे
  • या चित्रपटाचा टायटल पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा भीतीदायक आणि वेगळा लूक दर्शवितो
  • पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा अर्ध डोकं मुंडण केलेला आणि हातांवर लांब नखे असलेला अवतार दिसतो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्यासोबतच्या त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'राका' (Raka) असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाचा टायटल पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनच्या नवीन लूकची. आपल्या वाढदिवशी अल्लू अर्जुनने अ‍ॅटली दिग्दर्शित 'राका' चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. यातील त्याचा लूक पाहून चाहते म्हणत आहेत, "अल्लू अर्जुनला तोड नाही".

या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा आजवरचा सर्वात वेगळा आणि भीतीदायक लूक पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये त्याचा अर्धा टक्कल असलेला भाग आणि हातावर लांब केस तसेच तीक्ष्ण नखे दिसत आहेत. हा अवतार पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. चित्रपटातील हे ट्रान्सफॉर्मेशन भारतीय चित्रपटसृष्टीतील एक धाडसी पाऊल मानले जात आहे. त्यामुळे त्याच्या या आगामी चित्रपटाबाबत आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाय या लुकचे त्याचे चाहते कौतूक करत आहे. 

नक्की वाचा - 'हे बेबी'मधील चिमुकली 'एंजेल' आता झालीय ग्लॅमरस 'डिंपल गर्ल'! 18 वर्षांनंतरचा लूक पाहून चाहते थक्क

अल्लू अर्जुनच्या या लूकनंतर सोशल मीडियावर 'ट्रान्सफॉर्मेशनचा बाप' अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुन ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचे अर्धे डोके मुंडण केलेले दिसत असून त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत आक्रमक आहेत. लांब नखे आणि अंगावरील केसांमुळे तो एखाद्या हिंस्त्र प्राण्यासारखा भासत आहे. हा अवतार सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नक्की वाचा - Suraj Chavan Wife Pregnant: झापुक झुपुक सुरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? संजनाचा बेबी बंपमधील फोटो व्हायरल

"हा वेडेपणा आहे! अल्लू अर्जुन खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहे," अशा शब्दांत चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. अल्लू अर्जुनने इंडस्ट्रीत 23 वर्षे पूर्ण केली असली तरी, त्याचा प्रत्येक नवा प्रयोग प्रेक्षकांना थक्क करणारा ठरत आहे. अल्लू अर्जुनने आपल्या वाढदिवसानिमित्त 'राका' या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट साकारला जाणार असून, याच्या टायटल पोस्टरने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतणाऱ्या अल्लू अर्जुनने 'राका'साठी चक्क अर्ध्या डोक्याचे मुंडण केले आहे. पोस्टरमधील त्याचा हा लूक अत्यंत रहस्यमय आणि भयावह आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com