जाहिरात

'द गर्लफ्रेंड' चित्रपट केतन हत्या प्रकरणाची जोडल्याने खळबळ; दिग्दर्शकाच्या मुलांना थेट जीवे मारण्याची धमकी

अनेक युजर्सकडून राहुल रविंद्रन यांचा चित्रपट पुण्यात झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाशी जोडला जात आहे.

'द गर्लफ्रेंड' चित्रपट केतन हत्या प्रकरणाची जोडल्याने खळबळ; दिग्दर्शकाच्या मुलांना थेट जीवे मारण्याची धमकी

तेलुगु चित्रपट 'द गर्लफ्रेंड'चे दिग्दर्शक राहुल रविंद्रन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा चित्रपट 'द गर्लफ्रेंड'शी संबंधित वादानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सोशल मीडियावरुन त्यांच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर संतापलेल्या दिग्दर्शकाने एक्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

अनेक युजर्सकडून राहुल रविंद्रन यांचा चित्रपट पुण्यात झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाशी जोडला जात आहे. केतन अग्रवालला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरीने लोहगडावरुन ढकलून देत त्याची हत्या केली. 

सोशल मीडियावर यावरुन वाद निर्माण झाला आहे. यानंतर युजर्सने राहुल रविंद्रन यांच्यावर वैयक्तिक हल्ला सुरू केला. एका युजरने राहुल रविंद्रन यांच्या मुलाला या वादात ओढलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत दिग्दर्शकाने ३० जून रोजी एक्सवर लिहिलंय, मी ब्राझील विरुद्ध जपान मॅच पाहत होतो. मला ट्विटर अकाऊंटवर फुटबॉलशी संबंधित काही पाहायचं होतं, यासाठी मी एक्स अॅप उघडलं. दुर्देवाने मी नोटीफिकेशनही पाहिलं. आणि मी ते ट्विट पाहिलं. ते पाहून माझा संताप अनावर झाला. राग आल्यानंतर मी स्वत:ला शांत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र यंदा मी स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकलो नाही. 

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर राहुल रविंद्रन आणि त्याची गायिका पत्नी चिन्मयी श्रीपदावर निशाणा साधला जात आहे. त्यांनी राहुल रविंद्रनची रश्मिका मंदाना स्टारर द गर्लफ्रेंडला केतनच्या मर्डरशी जोडण्याचा प्रयत्न केला. सोबतच दिग्दर्शकावरही सवाल उपस्थित केला. युजर्सचं म्हणणं आहे की, पुरुषांवरील अत्याचारांवर चित्रपट बनवण्याऐवजी आपण फक्त स्त्रिया आणि मुलींच्या अनुभवांवरच चित्रपट का बनवतो?

त्यानंतर दुसऱ्या एका युझरने राहुल रविंद्रन यांना टॅग करून महिलांनी पुरुषांवर केलेल्या अत्याचारांवर चित्रपट बनवण्याची सूचना केली. रविंद्रन यांनी आता या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com