BMC Election 2026 : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच त्याच्या शिस्तीसाठी आणि मदतीसाठी ओळखला जातो. शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या अक्षयने पुन्हा एकदा आपल्या कृतीतून चाहत्यांची मने जिंकली आहेत. मतदान केंद्राबाहेर एका महिला फॅननं तिच्या वडिलांच्या कर्जाबद्दल सांगत अक्षयकडे मदतीची याचना केली, ज्यावर अक्षयने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नेमकं काय घडलं?
अक्षय कुमार मुंबईतील एका मतदान केंद्रावर आपले मत टाकण्यासाठी पोहोचला होता. मतदान करून बाहेर पडत असताना एका महिलेने त्याला अडवले आणि तिच्या कुटुंबाच्या गंभीर आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती दिली.
त्या महिलेच्या हातात एक पांढरा कागद होता. तिने रडत रडत अक्षयला सांगितले की, तिचे वडील खूप मोठ्या कर्जात अडकले आहेत आणि त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीची गरज आहे.
( नक्की वाचा : BMC Election 2026: मार्कर वापरण्यास याच वर्षापासून सुरू झाली? 'NDTV मराठी'चे Fact Check )
अक्षयने तत्काळ दिला मदतीचा हात
त्या महिलेची व्यथा ऐकून अक्षय अजिबात मागे हटला नाही. त्याने शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि तिला आपल्या टीमशी संपर्क साधण्यास सांगितले. अक्षयने तिला आश्वासन दिले की त्याची टीम या प्रकरणात लक्ष देईल.
जेव्हा त्या महिलेने कृतज्ञतेपोटी अक्षयचे पाय शिवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिला आदराने थांबवले आणि तो त्याच्या कारमध्ये बसून रवाना झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी अक्षय कुमारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याला खऱ्या अर्थाने बडे दिलवाला म्हटले आहे, तर काहींनी त्याला सिधसाधा आणि जमिनीवरचा माणूस असे संबोधले आहे. अक्षयचे हे वागणे पाहून त्याचे चाहते पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले असून, संकटकाळात मदतीला धावून जाण्याच्या त्याच्या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईकरांना मतदानाचे आवाहन
मतदान केल्यानंतर अक्षयने तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याने सर्व मुंबईकरांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. तो म्हणाला की, आजच्या दिवशी रिमोट कंट्रोल आपल्या हातात असतो. तुम्हाला मुंबईचा खरा हिरो बनायचे असेल, तर फक्त डायलॉग मारू नका, तर बाहेर या आणि योग्य व्यक्तीला निवडून देण्यासाठी मतदान करा. त्याने मतदानाचा अधिकार बजावण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
VIDEO | Mumbai: On BMC polls, actor Akshay Kumar says, “Today is the BMC election and, as Mumbaikars, this is the day when we have the remote control. Therefore, all the people of Mumbai must come out and vote, rather than complaining later about things not being in good shape.… pic.twitter.com/CibMsSkTsC
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
अक्षय कुमार लवकरच प्रियदर्शन यांच्या हैवान या चित्रपटात सैफ अली खानसोबत दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे भूत बंगला, हेरा फेरी 3 आणि वेलकम टू द जंगल यांसारखे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. अक्षयच्या आगामी चित्रपटांची त्याचे फॅन्स मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world