जाहिरात

VIDEO: अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात! कार उलटली; गाड्यांचा चुराडा

ही धडक इतकी भीषण होती की अक्षयच्या ताफ्यातील कार उलटली तर रिक्षाचाही चक्काचूर झाला. जखमी रिक्षा चालकाला अक्षय कुमारने स्वतः तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

VIDEO: अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात! कार उलटली; गाड्यांचा चुराडा

 Bollywood Actor Akshay Kumar Car Accident:  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना विमानतळावरून जुहू येथील त्यांच्या घरी जात असताना ही घटना घडली. अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाला एका रिक्षाने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की अक्षयच्या ताफ्यातील कार उलटली तर रिक्षाचाही चक्काचूर झाला. जखमी रिक्षा चालकाला अक्षय कुमारने स्वतः तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

Govinda News: गोविंदाने अफेअरच्या अफवांवर पहिल्यांदाच सोडले मौन, खरं-खोटं सर्वकाही सांगितलं, ऐका VIDEO

अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीचा अपघात...

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी (१९ जानेवारी) संध्याकाळी अक्षय कुमारच्या ताफ्यातील एका वाहनाचा मुंबईत अपघात झाला. अभिनेता आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना परदेश दौरा आटोपून विमानतळावरून जुहू येथील घरी परतत असताना ही घटना घडली अक्षय कुमार त्याच्या ताफ्यासह प्रवास करत असताना त्याच्या ताफ्यातील वाहनाला मागून एका ऑटो-रिक्षाने धडक दिली.

या ऑटो-रिक्षा मागून येणाऱ्या एका भरधाव मर्सिडीजने उडवले त्यानंतर ऑटो-रिक्षा पुढे सरकली आणि थेट अक्षय कुमारच्या ताफ्यातील इनोव्हा कारवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की ऑटो-रिक्षाचा पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि अक्षयची एस्कॉर्ट कार देखील उलटली. अपघातावेळी अक्षय कुमार त्याच्या गाडीत होता. अपघातानंतर लगेचच त्याचा मॅनेजर आणि वैयक्तिक सुरक्षा रक्षक त्यांच्या गाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. 

पोलिसांची घटनास्थळी धाव 

या ऑटोरिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने ऑटोरिक्षातील एका प्रवाशाला काहीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विश्वास नांगरे पाटीलही अपघातस्थळी दाखल झाले. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

Shefali Jariwala Death: "शेफालीवर कुणीतरी काळी जादू केली होती!" पती पराग त्यागीचा खळबळजनक दावा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com