10 वर्षीय इशित ट्रोल झाल्यानंतर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन सविस्तर बोलले, नागपुरच्या स्प्रूहाला म्हणाले....

Amitabh Bachchan spoke about overconfidence After 10-year-old Ishit Bhatt was trolled  said It makes you win the game : कौन बनेगा करोडपती (kaun banega crorepati 17) 17 सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी 10 वर्षीय इशित भट्ट आपल्या उद्धट स्वभावामुळे ट्रोल झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

कौन बनेगा करोडपती (kaun banega crorepati 17) 17 सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी 10 वर्षीय इशित भट्ट आपल्या उद्धट स्वभावामुळे ट्रोल झाला. तर नव्या एपिसोडच्या ज्युनिअर विकमध्ये महाराष्ट्रातील नागपुरचा स्प्रूहा तुषार शिनखेडे चर्चेत आला आहे. अमिताभ बच्चन यांनी तिला अतिआत्मविश्वासाबद्दल शिकवण दिली आहे. इशित भट्ट ट्रोल झाल्यानंतर अमिताभ बच्चन याबद्दल (Amitabh Bachchan spoke about overconfidence) बोलल्याने ही बाब महत्त्वपूर्ण ठरली आहे. 

अमिताभ बच्चन म्हणाले, तुम्ही सर्वांनी लहानपणी साप-शिडीचा खेळ खेळला असेल. जेव्हा तुम्ही जिंकण्याच्या मार्गावर असता तेव्हा अचानक एक साप येतो आणि तुम्ही खेळ हरता. तो एक साप तुमचा सर्व खेळ उद्ध्वस्त करतो. ते पुढे म्हणतात, खऱ्या आयुष्यातही असंच होतं. आयुष्यातील तो साप अतिआत्मविश्वास आहे. सर्व खेळ मूतभूत तत्वांवर अवलंबून असतात. यश, अपयश, पुरस्कार, ध्यान, एकजुटता, आत्मविश्वास. मात्र अतिआत्मविश्वास तुम्हाला एकाच झटक्यात खाली आणू शकतो. ससा आणि कासवाची गोष्ट तर तुम्ही ऐकलीच असेल. ससा समोर असताना कासव जिंकणं अशक्य होतं. मात्र ससा अतिआत्मविश्वासू होता, त्याच्या याच गुणामुळे तो अपयशी ठरला. 

नक्की वाचा - KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धट वर्तन, मुलाला मानसिक विकार? कौशल इनामदारांची पोस्ट चर्चेत

दहा वर्षांचा इशित भट्ट सोशल मीडियावर त्याच्या उद्धटपणामुळे प्रचंड ट्रोल होत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना तो ज्या पद्धतीने उत्तर देत होता, ते अनेकांना आवडलं नाही. शेवटी त्याच्या याच अतिआत्मविश्वास आणि उर्मटपणामुळे त्याला रिकाम्या हाताने परतावं लागलं. इशित ट्रोल होत असताना त्याच्या आई-वडिलांनाही दोष देण्यात आला.

Advertisement