जाहिरात

KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धट वर्तन, मुलाला मानसिक विकार? कौशल इनामदारांची पोस्ट चर्चेत

KBC kid goes viral : केबीसीमधील इशित वागणुकीवरुन अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मात्र याची दुसरी बाजू माहिती आहे का?

KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धट वर्तन, मुलाला मानसिक विकार? कौशल इनामदारांची पोस्ट चर्चेत

KBC 17 kid viral video : सध्या सोशल मीडियावर केबीसीच्या  (KBC) 17 व्या सिजनमध्ये सहभागी झालेला सहावीतील इशित भट्ट याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे लोक त्याच्या या वागणुकीवर आपलं मतही व्यक्त करीत आहे. इशित ज्या पद्धतीने बिग बी अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांना उत्तरं देत होता, त्यावर अनेक नेटकऱ्यांनी संताप  व्यक्त केला. तर कित्येकांनी त्याच्या आई-वडिलांना (KBC Child Misbehavior) दूषणं दिली. दरम्यान या प्रकरणातील दुसरी बाजू सांगणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मराठी संगीतकार कौशल इनामदार याने याबाबत आपली भूमिका मांडली. ही पोस्ट जबरदस्त व्हायरल झाली आहे. 

इशित भट्ट रिकाम्या हाताने परतला...

इशित भट्ट हा सहावीत शिकत असून मूळचा गुजरातचा आहे. तो हॉट सीटवर आल्यावर मला नियम सांगण्यात वेळ घालवू नका, मला सर्व माहीत असल्याचं म्हटलं. यानंतही प्रश्नाचे चार पर्याय सांगण्यापूर्वीच तो त्याची अत्यंत उर्मटपणे उत्तरं देत होता. यावेळी अमिताभ बच्चन यांनी अत्यंत संयमीपणे सर्व परिस्थिती सांभाळली. मात्र अशाच प्रकारे उद्धटपणे उत्तर देत असताना त्याने चुकीचा पर्याय निवडला आणि रिकाम्या हाताने त्याला घरी परतावं लागलं. 


इशितला मानसिक आजार?

कौशल इनामदार यांनी इशितबाबत एक पोस्ट लिहिली आहे. इनामदार यांची पत्नी सुचित्रा एक मानसशास्त्रज्ञ आहे. कौशल इनामदारांनी सांगितल्यानुसार, त्यांनी हा व्हिडिओ पत्नीला दाखवला, त्यावर मुलाला ADHD म्हणजेच Attention Deficit Hyperactivity Disorder असावा अशी शक्यता व्यक्त केली. हा विकार साधारपणे बालवयापासून सुरू होतो. त्यानंतरही अनेक वर्षांपासून या मानसिक विकाराची लक्षणं राहतात. ज्यामध्ये मुल हायपर अॅक्टिव्ह असतं. वागणुकीत संतुलन राहत नाही. इशितबाबत कौशल यांनी लिहिलंय, इशित भट्ट दहा वर्षांचा आहे. त्याची क्लिप नीट पाहिली तर लक्षात येतं की इतका टोकाचा आगाऊपणा आणि उर्मटपणा स्वभावात येण्यासाठी जे अनुभव यावे लागतात ते त्याने घेतलेही नाही. मी अशी अनेक मुलं पाहिलेली आहेत.त्याचा आगाऊपणा हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. तो मुलगा अतिशय घाबरलेला असावा आतून. तो आत्मविश्वाचा आव आणतोय. पण आतून तो भेदरून गेला आहे. त्याचं हे असं वागणं ही कदाचित मदतीसाठी हाक असावी. शिव्या अनेकजण देतीलच पण कुणीतरी अशा सगळ्या आई-बापांना जाऊन सांगणं गरजेचं आहे की ही कृत्रिम प्रसिद्धी आहे. इशितला थेरपीची गरज आहे आणि तुम्हाला थोड्या धीराची. 
जे लोक या मुलावर किंवा त्याच्या आई-वडिलांवर तोंडसुख घेत आहेत त्यांनाही माझं जरा असं सांगणं आहे की टाइप करण्यापूर्वी उलटे शंभर आकडे मोजा. आपला ताण बाहेर काढण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. सगळ्यांनी जरा दमाने घेण्याची अतोनात गरज आहे.

पालकांनी जरा दमाने घ्यावं...

कौशल इनामदार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय,  ‘सारेगमप' लिट्ल चॅम्प्सची निवड करत असताना मला अनेक पालक भेटायचे. पण एरवीही माझ्या कार्यशाळेत "आमचा राजू /राणी स्टेजवर कधी गाईल?" याची मुलांपेक्षा पालकांना घाई असते. आणि असंही नाही की या क्षेत्रात काही दैदिप्यमान अथवा सखोल करावं अशी त्यांची इच्छा असते. केवळ स्पर्धेत टिकून राहावं याचसाठी ही खटपट. परवा कुणीतरी मला सांगत होतं की पुढच्या पिढीमध्ये ADHD, ऑटिझम, ॲस्पर्जस सिंड्रोम, डिप्रेशन आणि इतर मानसिक विकारांचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com