नुकतीच दिवाळी देशभरात साजरी केली गेली. दिवाळीत कुणाला बोनस मिळाला तर कुणाला भेट वस्तू देण्यात आल्या. अशा वेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या स्टाफला दिवाळीची काय भेट दिली याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार होत आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10,000 रोख रक्कम आणि मिठाईची भेट दिल्याचे वृत्त आहे. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी बच्चन यांच्यावर काहींनी टीकेची झोड उठवली आहे, तर काहींनी बच्चन यांना समर्थन देवू केलं आहे.
जी रक्कम बच्चन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिली त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेटिझन्सनी बच्चन यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराच्या संपत्तीच्या तुलनेत ही रक्कम ‘खूपच कमी' आणि ‘लाजिरवाणी' असल्याचे मत व्यक्त केले आहे. इन्स्टाग्रामवर एका कंटेंट क्रिएटरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये, तो जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसत आहे. एका कर्मचाऱ्याने मिठाईच्या डब्यासोबत ₹10,000 रोख रक्कम मिळाल्याची माहिती दिली.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही याच रकमेचा उल्लेख आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आहे. त्यावरून सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. ही भेट अपुरी आहे. तर काहींनी अमिताभ बच्चन यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे. पण बहुतांश प्रतिक्रिया नकारात्मक आहेत. एका युजर्सने लिहिले की "ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी 24 तास काम केले, त्यांना यापेक्षा जास्त मिळायला हवे होते. त्यांनी एक प्रकारे दिवाळी भेटीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बच्चन यांची श्रीमंतीची जी उंची आहे त्या तुलनेत ही भेट काहीच नाही असं त्याने म्हटलं आहे.
तर, काहींनी थेट लाजिरवाणे अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. दिवाळीच्या बोनससाठी कर्मचारी 20 ते 25 हजार रुपये किंवा दुप्पट पगाराची अपेक्षा करतात. असेही अनेकांनी नमूद केले आहे. मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या महागड्या दिवाळी भेटीचे व्हिडिओ व्हायरल होत असताना, बच्चन यांनी दिलेली ही रक्कम चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडत आहे. शिवाय काही लोक एकमेकां विरोधात कमेंट करत असतानाही दिसत आहे.