Amitabh Bachchan Health : मेगास्टार अभिताभ (83 वर्षे) बच्चन सर्जरीसाठी रुग्णालयात असल्याची माहिती त्यांनी एका पोस्टवर शेअर केल्याची माहिती आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. बिग बींनी एक ब्लॉग शेयर केला आहे. यामध्ये त्यांनी सर्जरी, आयसीयू आणि या उपचाराचा कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक आणि शारिरीक गोष्टींवर कसा परिणाम होतो, याबाबत आपलं मत व्यक्त केलं. अमिताभ बच्चनची ही पोस्ट वाचून चाहते बिग बींबाबत चिंता व्यक्त करीत आहेत.
अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट...
८३ वर्षीय अभिनेत्याने आपल्या पर्सनल ब्लॉगवर एक भावुक करणारी नोट लिहिली आहे. रुग्णालयात सर्जरी आणि ICU मध्ये सक्षम डॉक्टर आणि मेडिकल स्टाफकडून देखरेख, रुग्णालयातून डिस्चार्ज आणि घरवापसी हा काळ सर्वात कठीण होता. तसं पाहता शारिरीक, मानसिक आणि व्यावहारिकपणे तुम्ही एक चॅम्पियन असतं. मात्र एक दिवस अपयश तुमच्या दारात उभं असतं... हा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतो.
नक्की वाचा - सलमान खानला कोणता आजार? महाभयंकर आजार काय आहे? अभिनेत्यानेच दिली होती धक्कादायक माहिती
त्यांनी पुढे लिहिलंय, काही लोक हिमतीने याला सामोरं जातात, काही हार मानतात. जे प्रयत्न करतात आणि धाडस दाखवितात ते नेहमीच चॅम्पियन ठरतात. जे असं करीत नाही ते अडजस्टमेंट करतात आणि जुनी शान गोंजारत राहतात. प्रत्येक व्यक्ती ही निवड स्वत: करतो. दोघांपैकी काहीच चुकीचं नाही. खूश राहा आणि स्वस्थ राहा.
T 5806 - खेल समाप्त हो गया ! पर काम चल रहा है
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 20, 2026
अभिताभ बच्चन यांचं ट्वीट...
यानंतर काही वेळाने बच्चन यांनी सोशल मीडिया हँडलवर एक रहस्यमयी मेसेज ट्विट केलं. ज्यामध्ये लिहिलं होतं..T 5806 - खेल खत्म हो गया... (खेळ संपला) मात्र काम अद्यापही सुरू आहे. या पोस्टमध्ये चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. चाहत्यांनी कमेंटमध्ये बिग बीच्या आरोग्य चांगलं राहावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. एका फॅनने लिहिलंय, लवकर बरे व्हा अमित जी. दुसऱ्याने लिहिलंय.. आपल्या आरोग्याची काळजी घ्या... दरम्यान अमिताभ बच्चन यांची नेमकी कशासंदर्भात सर्जरी झाली याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world