जाहिरात

Amruta Subhash : अमृता सुभाषच्या नवऱ्यावर जारण केलंय! चित्रपटप्रेमी बोलू लागले, अविनाश नारकरांनाही चर्चेत ओढले

सध्या सोशल मीडियावर अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांच्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.

Amruta Subhash : अमृता सुभाषच्या नवऱ्यावर जारण केलंय! चित्रपटप्रेमी बोलू लागले, अविनाश नारकरांनाही चर्चेत ओढले

Amruta Subhash and Sandesh Kulkarni Dance Video :  सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याच्या आयुष्यातील खास क्षण टिपण्यासाठी पॅपराझी जिवाचं रान करताना दिसतात. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखादा व्हिडिओ आल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारच्या कमेंट येतील किंवा त्या व्हिडिओचे काय पडसाद पडू शकतील हे सांगणं तसं कठीण. 

सध्या मराठी अभिनेत्री अमृता सुभाष आणि तिचा पती संदेश कुलकर्णी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी (Jaran movie released on 6th June 2025) हृषिकेश गुप्ते दिग्दर्शित आणि अमृता सुभाष प्रमूख भूमिकेत असलेला 'जारण' नावाचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीदरम्यान अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी फ्लोअरवर मनसोक्त डान्स करीत होते. यावेळेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Latest and Breaking News on NDTV

दोघेही आनंदात डान्स करीत असले तरी अमृता सुभाष हिचा पती संदेश कुलकर्णी याच्या डान्सवरुन तो ट्रोल होत असल्याचं दिसत आहे. त्याच्या डान्सवरुन सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तर संदेशच्या डान्सची तुलना थेट अभिनेता अविनाश नारकर यांच्याशी केली आहे. अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकरदेखील डान्सचे अनेक व्हिडिओ (Sandesh Kulkarni Trolled) सोशल मीडियावर शेअर करीत असतात. अविनाश नारकर यांच्या डान्स प्रकारामुळे ते सोशलवर ट्रोल होत असतात. आता तर संदेश कुलकर्णी आणि अविनाश नारकर यांच्या डान्सशी तुलना केली जात आहे. मसाला मनोरंजन नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

एकाने तर अविनाश नारकर अंगात शिरला का, अशी कमेंट केली आहे. मात्र कित्येकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. जे ज्या पद्धतीने बिनधास्तपणे, कोणाचाही विचार न करता डान्स करीत आहेत, त्याचं कौतुक केलं जात आहे.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com