Ananya Panday Viral Video : अनन्या पांडे स्टारर 'चांद मेरा दिल'ची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये अनन्या भरतनाट्यमला हिप-हॉप आणि अन्य स्टाईलने परफॉर्म करत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटातील हिरो लक्ष्य लालवानी त्यांना पाहून थक्क झाले आहेत. पण या मॉडर्न फ्यूजनला क्लासिकल डान्सर्सने नाराजी व्यक्त केली आहे. हे भरतानाट्यमचं अवमान असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर लोक प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.
लोकांच्या प्रतिक्रिया काय?
प्रसिद्ध भरतनाट्यम डान्सत अनीता आर रत्नमने या क्लिपला पाहून स्पष्ट म्हटलं,हे पाहून असं वाटलं भरतनाट्यमला जबरदस्ती बंधक बनवलं आहे. त्यांनी म्हटलंय की,भरतनाट्यममध्ये तंत्रज्ञान,नियंत्रण,परंपरा,जिओमॅटरी,संगीत आणि भावनांचा मेळ असतो. पण या व्हिडीओत या सर्व गोष्टी पाहायला मिळत नाहीत. अनिताने म्हटलंय की,अनेक वर्षांपासूनची मेहनत,समर्पण आणि परंपरेला समजल्याशिवाय त्याचा वापर करणे खूप दु:खद आहे. ही कोरिओग्राफी अल्गोरिदमच्या भीतीसारखी वाटते."
नक्की वाचा >>Kalyan News: केडीएमसीच्या तोडक कारवाईला विरोध, पोलिसांशी घातली हुज्जत, टिटवाळ्यातील 'त्या' 5 महिला रडारवर
क्लासिकल आर्ट्सची उडवली खिल्ली
दुसरी डान्सर कृतिका शिवास्वामीनेही यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय, अनन्या पांडेनं सादर केलेलं भरतनाट्यम पाहिलं तर असं वाटेल की,फिल्म इंडस्ट्री क्लासिकल आर्ट्सबाबत किती असंवेदनशील आहे. ते या गोष्टीची खिल्ली उडवतात आणि त्या सार्वजनिकरित्या दाखवण्याची हिंम्मत ठेवतात.कृतिकाने असंही म्हटलं की,भारतात क्लासिकल आर्ट्सची खिल्ली उडवणाऱ्यांविरोधात कोणताही कायदेशीर मार्ग नाही. यासाठी लोक काहीही करू शकतात.
Watching this clip felt like Bharatanatyam being held hostage by a catastrophic misunderstanding of the form.
— Anita R Ratnam (@aratnam) May 25, 2026
Somewhere between the flailing arms and random camera moves, the dance quietly packed its bags and exited the building.
Bharatanatyam is built on technique, control,… https://t.co/Q8CUIdbdA9
नक्की वाचा >> Shirdi News: आताच अलर्ट व्हा! साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांची होतेय लूट, शिर्डीत काय-काय घडतंय?
दरम्यान,चित्रपटाची असिस्टंट कोरिओग्राफर अनन्या आर कुरुप यांची स्टाईल वेगळी आहे. त्यांनी अनन्याचं कौतुक करत म्हटलं की, ती खूप चांगली आणि गोड व्यक्ती आहे. कोरियोग्राफर म्हणाली, भरतनाट्यम शिकण्याचा अनुभव खूप चांगला राहिला आहे. अनन्याने तिच्या नृत्यात हे खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शित केलं आहे.'चित्रपट चांद मेरा दिल'चित्रपटाची कथा विवेक सोनी आणि तुषार परांजपे यांनी लिहिली आहे. सचिन-जिगर यांचं संगीत आहे. हा चित्रपट अनन्या पांडे आणि लक्ष्यची पहिली ऑन स्क्रीन जोडी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world