जाहिरात

Kalyan News: केडीएमसीच्या तोडक कारवाईला विरोध, पोलिसांशी घातली हुज्जत, टिटवाळ्यातील 'त्या' 5 महिला रडारवर

टिटवाळा येथील बनेली परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) तोडक कारवाईला विरोध केल्याप्रकरणी पाच महिलांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan News: केडीएमसीच्या तोडक कारवाईला विरोध, पोलिसांशी घातली हुज्जत, टिटवाळ्यातील 'त्या' 5 महिला रडारवर
KDMC Viral News Today

Titwala Crime News :  टिटवाळा येथील बनेली परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) तोडक कारवाईला विरोध केल्याप्रकरणी पाच महिलांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.“घर खरेदीसाठी आम्ही लाखो रुपये मोजले आहेत, मग आम्हाला बेघर का केले जात आहे?” असा सवाल करत संबंधित महिलांनी कारवाई पथकाला विरोध केल्याचे समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,बनेली परिसरात शासकीय जागेवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत घरांवर केडीएमसीकडून मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई सुरू आहे.आतापर्यंत जवळपास 400 घरांवर कारवाई करण्यात आली आहे.या घरांसाठी नागरिकांनी 5 ते 6 लाख रुपये मोजून घरे खरेदी केल्याचा दावा केला आहे.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,चाळ माफिया,भूमाफिया आणि काही स्थानिक घटकांच्या माध्यमातून हे अनधिकृत बांधकामांचे रॅकेट चालवले जात होते.मात्र आता कारवाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नक्की वाचा >> Gadchiroli News: गडचिरोलीत खळबळजनक घटना, एकाच दिवशी 500 वटवाघुळांचा मृत्यू, भीतीदायक कारण आलं समोर

बेघर होण्याच्या भीतीमुळे काही महिला आक्रमक झाल्या आणि..

केडीएमसीचे बुलडोझर परिसरात दाखल होताच अनेक नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला.बेघर होण्याच्या भीतीमुळे काही महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलीस तसेच कारवाई पथकाला विरोध केला.यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून झटापट झाल्याचीही नोंद आहे.या प्रकरणी टीटवाळा पोलीस स्टेशन येथे रुबीना खान,साफिया खान,शाहिना खान, सरफुल शेख आणि शाहीर खान या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला

संबंधित जबाबदार व्यक्तींवरही कठोर कारवाई करण्याची मागणी

पोलिसांनी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.दरम्यान,अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबरोबरच नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भूमाफिया,चाळ माफिया आणि संबंधित जबाबदारांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com