जाहिरात

हार्दिक पांड्याने केली नताशाची फसवणूक? या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण

Hardik Pandya And Natasa Stankovic: हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यामध्ये घटस्फोट होण्यामागील नेमके कारण काय होते? यावरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

हार्दिक पांड्याने केली नताशाची फसवणूक? या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण

Hardik Pandya And Natasa Stankovic: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे वैवाहिक नाते संपुष्टात आणल्याची अधिकृत घोषणा केली. चाहत्यांना घटस्फोटाची माहिती देण्यापूर्वीच हार्दिक आणि नताशाच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. विभक्त होण्यापूर्वी तसेच झाल्यानंतरही दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने घटस्फोट घेण्यामागील नेमके कारण उघडकीस आले नव्हते. या चर्चांदरम्यानच Redditवरील एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नताशाने लाइक केल्यानं या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. फसवणूक-विश्वासघात, घटस्फोट अशा आशयाची ही पोस्ट आहे. 

(नक्की वाचा: हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय)

पोस्टमधील नेमका विषय काय आहे?

सोशल मीडियावरील फसवणूक आणि भावनिक छळाशी संबंधित पोस्ट नताशाने लाइक केली. यासह तिने टॉक्सिक नातेसंबंधांबाबतच्याही काही पोस्ट लाइक केल्या आहेत. नताशाने अशा आशयाच्या पोस्ट लाइक केल्याने हार्दिकसोबतच्या घटस्फोटामागील संभाव्य कारणाबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.   

(नक्की वाचा: नताशासोबत घटस्फोटानंतर हार्दिक अनन्या पांडेला डेट करतोय? जवळच्या व्यक्तीने सांगितलं...)

Natasa Stankovic Liked Reels About Cheating & Emotional Abuse: Apparently Hardik Cheated On Her, Leading To Divorce☕️
byu/Unique_Ad4358 inInstaCelebsGossip

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सोशल मीडियावरील एका युजरने रेडिटवर कित्येक स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, यातील काही पोस्ट नताशानेही लाइक केल्याचे दिसत आहे. "नताशा स्टेनकोविकने फसवणूक आणि भावनिक छळाशी संबंधित रील्स लाइक केल्या आहेत", असे कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे. यानंतरच सोशल मीडियावरील युजर्संनी हार्दिक-नताशाच्या संपुष्टात आलेल्या नात्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 

(नक्की वाचा: घटस्फोटानंतरही प्रेम कायम! नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रिया Viral)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
ऐश्वर्या रायपासून वेगळे होण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडले मौन, घटस्फोटाबाबत अखेर सांगितले सत्य
हार्दिक पांड्याने केली नताशाची फसवणूक? या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण
Standup Comedian Munawar Farooqui what Said About Konkan in Objectionable Video
Next Article
नितेश राणे म्हणाले, 'हिरवा साप', मनसेचाही हिसका; स्टँडअपदरम्यान मुनव्वर नेमकं काय म्हणाला?