जाहिरात

'धुरंधर'च्या यशादरम्यान अर्जुन रामपालने केला साखरपुडा; लग्नाआधीच 2 मुलांचा बाबा, प्रेयसी वयाने लहान

Arjun Rampal got engaged to his girlfriend Gabriella Demetriades: धुरंधरचं यश साजरं केलं जात असताना अर्जुन रामपालने चाहत्यांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे.

'धुरंधर'च्या यशादरम्यान अर्जुन रामपालने केला साखरपुडा; लग्नाआधीच 2 मुलांचा बाबा, प्रेयसी वयाने लहान

सध्या देशभरात 'धुरंधर' चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. यादरम्यान चित्रपटातील अभिनेत्यांचं मोठं कौतुक केलं जात आहे. दरम्यान चित्रपटातील ५३ वर्षीय अभिनेता अर्जुन रामपालने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याने साखरपुडा केला आहे. अर्जुन रामपाल बऱ्याच वर्षांपासून फॅशन डिझायनर गॅब्रिएला डेमेत्रिएड्ससोबत साखरपुडा  झाला. ३०० कोटींची उड्डाणं घेणाऱ्या धुरंधर चित्रपटात अर्जुन रामपाल मेजर इकबालची भूमिका साकारत आहे. त्याच्या अभिनयाचंही कौतुक केलं जात आहे. 

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर नुकताचा पॉडकास्ट चॅप्टर २ ट्रेलर शेअर केलाय, ज्यात ती अर्जुन आणि गॅब्रिएलाचे प्रेम कहाणी, लग्न आणि कुटुंबाबाबत बोलत आहे. या क्लिपमध्ये गॅब्रिएला म्हणते, आम्ही अद्याप लग्न केलेलं नाही. मात्र कुणाला माहिती आहे? यावर रामपाल म्हणतो, आम्ही साखरपुडा केलाय आणि तुझ्या पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच आम्ही याबाबत खुलासा केला.

 हे जोडपं २०१९ पासून एकत्र आहे आणि त्यांना दोन मुले आहेत, अरिक आणि अरिव. याआधी अर्जुन रामपालने मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केलं होतं. अर्जुन आणि मेहर यांना दोन मुली आहेत, मायरा आणि महिका. 

२०१९ मध्ये पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर, अर्जुन रामपाल हा  प्रेयसी गॅब्रिएलासोबत आहे. गॅब्रिएला त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. त्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. त्यांना लग्नापूर्वी अरिक आणि अरिव ही दोन मुलं आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com