Dhurandhar 2 Movie Update : रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला धुरंधर हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. या सिनेमानं आत्तापर्यंत जगभरात 900 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. धुरंधरच्या यशानंतर आता चर्चा रंगलीय ती म्हणजे या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची, अर्थात धुरंधर 2 ची. या सिनेमाबद्दलची सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
धुरंधर 2 ची रिलीज डेट आणि टक्कर
डायरेक्टर आदित्य धरने धुरंधर रिलीज होताच त्याच्या सीक्वलची घोषणा करून चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं होतं. आता या सीक्वलबाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे. धुरंधर 2 हा सिनेमा 19 मार्च 2026 मध्ये रिलीज होणार आहे.
विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची थेट टक्कर साऊथचा सुपरस्टार यश याच्या टॉक्सिक या सिनेमासोबत होणार आहे. त्यामुळे 2026 च्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना मोठा राडा पाहायला मिळणार हे नक्की आहे.
( नक्की वाचा : Dhurandhar: धुरंधर सिनेमात दाखवलेला उजैर बलोच नक्की कोण?'तो' जुना इंटरव्ह्यू पाहून उडेल थरकाप, पाहा Video )
काय असेल धुरंधर 2 ची स्टोरी?
धुरंधर 2 ची स्टोरी पहिल्या पार्टच्या क्लायमॅक्सपासून पुढे नेली जाणार आहे. पहिल्या भागात रणवीर सिंहने हमजा अली मजारचं कॅरेक्टर प्ले केलं होतं, जो शेवटी जसकिरत सिंह रंगी असल्याचं उघड होतं. तो भारताचा एक सीक्रेट एजंट असतो आणि पाकिस्तानमध्ये एका गुप्त मिशनवर गेलेला असतो.
आता दुसऱ्या भागात हमजाचा पुढचा टार्गेट हा बडे साहब उर्फ इकबाल असेल, असं मानलं जातंय. हा तोच इकबाल आहे ज्याने 26/11 सह भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला होता.
( नक्की वाचा : Dhurandhar: रहमत डकैतचा अंत सिनेमात दाखवला तसाच झाला होता का? वाचा 'Reel vs Real' स्टोरी )
दुसऱ्या भागात रणवीरची भूमिका अधिक पॉवरफुल असणार आहे. धुरंधर 2 ची सुरुवात हमजा दिवंगत रहमानची गादी सांभाळण्यापासून होईल. तो पाकिस्तानच्या राजकारणात एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून समोर येईल.
या पार्टमध्ये हमजाच्या बॅक स्टोरीवर जास्त फोकस केला जाणार आहे. जसकिरतचा प्रवास कसा झाला आणि त्याने धुरंधर मिशनचं नेतृत्व कसं केलं, हे सगळं या भागात पाहायला मिळेल.
अशी असेल स्टार कास्ट
धुरंधर 2 च्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण पहिल्या भागातील बहुतेक कलाकार यात पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.
रणवीर सिंहसोबतच आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन, मानव गोहिल आणि दानिश पंडोर हे कलाकार असू शकतात. मात्र, दुसऱ्या भागात प्रेक्षक अक्षय खन्नाला मिस करू शकतात, कारण त्याचं रहमान डकैत हे पात्र आता संपलं आहे.
(नक्की वाचा : Akshaye Khanna: विनोद खन्नांची दुसरी पत्नी; Dhurandhar अक्षय खन्नाबद्दल बोलताना म्हणाली, 'मी कधीच आई...' )
धुरंधरचे बजेट आणि रनटाइम
रणवीर सिंहचा धुरंधर हा सिनेमा 140 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. आदित्य धरने या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा तब्बल 214 मिनिटांचा आहे, त्यामुळे हा भारतातील सर्वात लांब सिनेमांपैकी एक ठरला आहे. या सिनेमाचे ओटीटी राईट्स नेटफ्लिक्सने 130 कोटी रुपयांना विकत घेतले असून जानेवारी 2026 पर्यंत हा सिनेमा ओटीटीवर पाहता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world