जाहिरात

Asha Bhosle : 'ते' गाणं गाताच आशा ताईंना चक्कर आली; तब्बल 10 दिवसांच्या रियाजानंतर स्टुडिओमध्ये असं होतं चित्र

आशा ताईंच्या संगीत करिअरमधील हिट गाण्यांपैकी एका गाण्याचा किस्सा समोर आला आहे. हे गाणं इतकं कठीण होतं की, ते गायल्यानंतर त्यांना भोवळ आली. 

Asha Bhosle : 'ते' गाणं गाताच आशा ताईंना चक्कर आली; तब्बल 10 दिवसांच्या रियाजानंतर स्टुडिओमध्ये असं होतं चित्र

Asha Bhosle News : आशा भोसले यानी गायलेली गाणी अविस्मरणीय राहिली. त्यांच्या निधनानंतर आशा भोसले आणि त्यांच्या गाण्याचे अनेक किस्से सध्या चर्चिले जात आहे. त्यांच्या संगीत करिअरमधील हिट गाण्यांपैकी एका गाण्याचा किस्सा समोर आला आहे. हे गाणं इतकं कठीण होतं की, ते गायल्यानंतर त्यांना भोवळ आली. 

10 दिवस घरात सराव केला अन्...

हे गाणे रेकॉर्ड करण्यापूर्वी आशा भोसले खूप घाबरल्या होत्या. या गाण्याला आर.डी. बर्मन यांनी संगीत दिलं होतं. तेव्हाचं ते गाणं काळाच्या मानाने खूप वेगवान आणि गुंतागुंतीचं होतं. या गाण्यात 'रॉक अँड रोल'चा असा तडका होता की ते गाणे कोणत्याही गायकासाठी एक मोठं आव्हान होतं. जेव्हा पंचम दा यांनी पहिल्यांदा आशाजींना या गाण्याची ताल ऐकवली, तेव्हा त्यांना वाटलं की, त्या हे गाणे गाऊ शकणार नाहीत. आशाजींना गाण्याच्या गतीपेक्षा त्यातील स्वरांच्या चढ-उताराची जास्त काळजी वाटत होती. या गाण्यासाठी ज्या ऊर्जेची गरज होती, त्यासाठी श्वासावर जबरदस्त नियंत्रण असणं आवश्यक होते. हे आव्हान स्वीकारून आशाजींनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचं ठरवलं आणि सलग १० दिवस घरी या गाण्याचा सराव केला. रेकॉर्डिंगच्या वेळी कोणतीही चूक होऊ नये म्हणून त्यांनी श्वास रोखून धरण्यावर आणि श्वासाच्या गतीवर खूप मेहनत घेतली.

नक्की वाचा - Asha Bhosle : यशस्वी होण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचं? आशा भोसलेंचं Qualification पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

फायलन रेकॉर्डिंगला काय झालं?

१० दिवसांच्या कठीण रियाजानंतर जेव्हा फायनल रेकॉर्डिंगचा दिवस आला, तेव्हा आशाजींनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. हे गाणे इतके ऊर्जादायी होतं की, ते गाताना त्यांना त्यांच्या फुप्फुसांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करावा लागला. असं म्हटलं जातं की, रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर आशा भोसले इतक्या थकल्या होत्या की, त्यांना गाणं पूर्ण झाल्यानंतर चक्कर येऊ लागली. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली होती आणि त्यांना सावरण्यासाठी इतरांना आधार द्याला लागला होता. पण त्यांनी दिलेलं परफॉर्मन्स पाहून स्टुडिओतील प्रत्येक जण थक्क झाला होता.

आशाजींची मेहनत फळाला आली आणि चित्रपट प्रदर्शित होताच हे गाणे रातोरात ब्लॉकबस्टर ठरले. शम्मी कपूर यांचा डान्स, आशा पारेख यांचा अभिनय आणि आशा भोसले यांचा आवाज यांनी मिळून जादू केली. हे गाणं म्हणजे 'आजा आजा मैं हूं प्यार तेरा'. १९६६ साली प्रदर्शित झालेल्या 'तिसरी मंजिल' चित्रपटातील हे गाणे आजही अनेकांच्या आवडीचं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com