जाहिरात

Tanya Mittal angry on Paparazzi: तान्या मित्तल पापराझींवर भडकली; नेमकं काय घडलं?

तान्याने हे स्पष्टीकरण देताना सुरुवातीला जरी ती रागावलेली दिसली, मात्र तिने त्वरित स्वतःला सावरले. एवढे बोलल्यानंतर लगेचच तिने हात जोडून हसतमुखाने पापाराझींसाठी पोज दिली आणि फोटो काढले.

Tanya Mittal angry on Paparazzi: तान्या मित्तल पापराझींवर भडकली; नेमकं काय घडलं?
Tanya Mittal
Social Media

Tanya mittal angry on paparazzi: बिग बॉस 19 स्पर्धक तान्या मित्तल शोमधून बाहेर पडल्यानंतरही पापाराझी तिचा पाठलाग करताना दिसत आहेत. तान्या देखील या प्रसिद्धीचा पुरेपूर आनंद घेत आहे. मात्र, अलीकडेच एका घटनेमुळे तिने आपली वेगळी बाजू दाखवून दिली आहे.

तान्या मित्तलच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती आपल्या गाडीजवळ उभी असताना हा प्रसंग घडला. तान्या गाडीजवळ असताना तिचे सुरक्षा रक्षक तिच्याजवळच होते. फोटो काढताना पापाराझींनी सुरक्षा रक्षकांना उद्देशून, "बाउंसर साईडला व्हा" असे म्हटले.

पापाराझींनी 'बाउंसर' हा शब्द वापरताच तान्याला थोडे वाईट वाटले. तिने लगेच त्यांना समजावत म्हटले, "कोणीही 'बाउंसर' बोलणार नाही. हे माझ्या भावासारखे आहेत, त्यांचे नाव घ्या, पण त्यांना बाउंसर म्हणू नका."

तान्याने हे स्पष्टीकरण देताना सुरुवातीला जरी ती रागावलेली दिसली, मात्र तिने त्वरित स्वतःला सावरले. एवढे बोलल्यानंतर लगेचच तिने हात जोडून हसतमुखाने पापाराझींसाठी पोज दिली आणि फोटो काढले.

(नक्की वाचा-  साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

तान्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच, तिचे चाहते तिची प्रशंसा करू लागले.

एका चाहत्याने लिहिले, "तान्या मित्तलला चांगले माहीत आहे की, कोणाला किती सूट द्यायची आहे. काही युजर्सनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या. एकाने मिश्किलपणे लिहिले, "बाउंसरसुद्धा धक्क्यात आहेत, की एकदम काय झाले." आणकी एकाने म्हटलं की, "हिचा शो अजून संपला नाहीये का?"

Listen to the latest songs, only on JioSaavn.com