जाहिरात

Suraj Chavan Bigg Boss Marathi 5 Winner: सुरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोची पहिली झलक समोर, लग्नसोहळा कसा असेल?

Suraj Chavan Bigg Boss Marathi 5 Winner: 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा विजेता आणि डिजिटल कंटेंट क्रीएटर सुरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीची पहिली झलक समोर आलीय.

Suraj Chavan Bigg Boss Marathi 5 Winner: सुरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोची पहिली झलक समोर, लग्नसोहळा कसा असेल?
"Suraj Chavan Future Wife First Glimpse: सुरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोची पहिली झलक"
Abhijat Marathi OTT And Ankita PrabhuWalawalkar Insta

Suraj Chavan Bigg Boss Marathi 5 Winner: 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावकरने सुरजचे लग्न ठरल्याची गुड न्यूजही काही दिवसांपूर्वी सांगितली होती. अंकिताने सुरजच्या गावी जाऊन त्याची आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे दोघांसोबतचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हापासून सुरजची पत्नी दिसायला कशी आहे? तिचे नाव काय आहे? ती काय करते? दोघांचं लग्न कधी होणार? यासह अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी चाहतेमंडळी आतुर झाले आहेत. यादरम्यानच सुरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीची पहिली झलक चाहत्यांसमोर समोर आलीय. 

सुरज चव्हाणची होणारी बायको कशी दिसते? पाहा व्हिडीओ...

अभिजात मराठी ओटीटी (Abhijat Marathi OTT) या इन्स्टा हँडलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सुरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोची झलक दिसलीय. व्हिडीओमध्ये कोकण हार्टेड गर्ल आणि सुरजच्या कुटुंबीयांमध्ये संवाद तसेच त्यांच्यामध्ये रंगलेली गंमतीशीर खेळ स्पर्धा पाहायला मिळतेय. 

सुरज चव्हाणचं लग्न कोणी जमवलं?

अंकिता प्रभू-वालावकरने सुरजच्या कुटुंबीयांना विचारलं की याचं लग्न कोणी ठरवलं? तर ताईने सांगितलं की सुरजने स्वतःचं लग्न स्वतःच ठरवलं. साखरपुडा, हळदी समारंभ, लग्नसोहळा सर्व गोष्टी एकाच दिवशी होणार असल्याची माहिती सुरजने दिलीय. व्हिडीओमध्ये सुरजचे कुटुंबीय आणि त्याची होणाऱ्या पत्नीमध्ये गंमतीशीर खेळ रंगल्याचंही दिसतंय. याच व्हिडीओमध्ये सुरजच्या होणाऱ्या पत्नीची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. 'सुरजची बायको दिसली', अशा कमेंट्सही चाहत्यांनी करुन आनंद व्यक्त केलाय. 
(नक्की वाचा: Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस फेम सुरज चव्हाणचं लग्न ठरलं, कोकण हार्टेड गर्ल म्हणाली...)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Abhijat Marathi OTT Insta

अंकिताने सुरजसोबत झालेल्या भेटीचे फोटो 21 सप्टेंबर 2025 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 'सुरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट' या कॅप्शनसह तिने सुरज आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटो पोस्ट केले होते. पण सुरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा तिने इमोजीच्या मदतीने झाकला होता.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Ankita PrabhuWalawalkar Instagram

Listen to the latest songs, only on JioSaavn.com