Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: 'गुलीगत धोका' म्हणत महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आणि बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सुरज चव्हाण सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॉस मराठी सीझन 6च्या स्पेशल एपिसोडमध्ये सुरज चव्हाणने हजेरी लावली होती. यावेळेस स्पर्धक राकेश बापट, तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद यांच्याशी गप्पा मारताना सुरजने केलेल्या एका विधानाने सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली आहे. या तिघांशी गप्पा मारताना त्याने "बाहेर या, तुम्हाला नवीन न्यूज मिळेल" असे म्हणत एक मोठे संकेत दिले आहेत, ज्यामुळे तो लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सुरज चव्हाणने नेमके काय म्हटले?
सुरज चव्हाण आपल्या साधेपणाने आणि अनोख्या शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतो. या एपिसोडमध्ये राकेश बापट, तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद यांच्या गप्पा मारण्याच्या ओघात सुरजनेमोजक्या शब्दांत सूचक उत्तर दिले. त्याने अत्यंत आत्मविश्वासाने आणि हसत "तुम्ही बाहेर या, तुम्हाला नवीन न्यूज मिळेल" असे म्हटल्यामुळे हे कलाकारही क्षणभर थक्क झाले.
सुरज चव्हाणच्या विधानामुळे चर्चांना का आले उधाण?
सुरजच्या या विधानानंतर त्याच्या चाहत्यांसह बिग बॉसच्या प्रेक्षकांनाही प्रश्न पडलाय की त्याने 'नवीन न्यूज' असे म्हटल्यामुळे तो लवकरच वडील होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे का? जरी सुरजने स्पष्टपणे काहीही सांगितले नसले, तरी त्याच्या चेहऱ्यावरील हास्य आणि बोलण्यातील आत्मविश्वास यामुळे ही बातमी काहीतरी आनंदाची असल्याचे चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे सुरजने सांगितल्याप्रमाणे नवीन न्यूज म्हणजे नेमके काय असणार आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते-प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
(नक्की वाचा: Dhasal Marathi Movie: ललित प्रभाकर साकारणार विद्रोही कवी नामदेव ढसाळ! डॉ. आंबेडकर जयंतीला भव्य पोस्टर रिलीज)
प्रेक्षकांमध्ये उत्सुकतासुरज चव्हाणचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. एका सामान्य परिस्थितीतून येऊन आज तो महाराष्ट्राचा लाडका कलाकार बनला आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या या नवीन वळणाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता सुरज नक्की कोणत्या 'नवीन न्यूज'चा इशारा देत आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एखादा नवीन प्रोजेक्ट की स्वतःच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीबाबत सुरज स्वतः अधिकृत भाष्य कधी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world