- 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा विजेता सुरज चव्हाणचं केळवण
- सुरज चव्हाणनं होणाऱ्या बायकोसाठी जबरदस्त उखाणा घेतला
- सुरज चव्हाणचं लग्न कधी होणार आहे?
Suraj Chavan Kelvan Video: 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा विजेता सुरज चव्हाणने लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो लग्नाच्या विषयामुळे चर्चेत आहे. सुरजची होणारी बायको कोण आहे, तिचं नाव काय आहे, ती नेमकं काय करते? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अखेर चाहत्यांनी प्रतीक्षा संपुष्टात आलीय. सुरज चव्हाण आणि त्याची होणाऱ्या पत्नीचा केळवण सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुरजच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा स्पष्टपणे पाहायला मिळालाय.
सुरज चव्हाणचं केळवण | Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan Kelvan Video
कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकरने तिच्या घरी सुरज चव्हाण आणि त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी केळवण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळेस दोघांनी एकमेकांसाठी जबदस्त उखाणे देखील घेतले. "बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण, सजनाचं नाव घेतो बोललो होतो ना आधी करिअर मग लग्न" असा जबरदस्त उखाणा सुरजने होणारी पत्नी संजनासाठी घेतला. तर "बिग बॉसचा व्हिनर झाला माझ्या प्रेमात सायको, सुरजरावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको", असं लय भारी नाव संजनाने घेतले.
सुरज चव्हाण आणि संजनाचा उखाणा | Suraj Chavan And Sanjana Ukhana Video
काही दिवसांपूर्वी कोकण हार्टेड गर्लनंच सोशल मीडियावर सुरज आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो शेअर केले होते. पण सुरजच्या पत्नीचा चेहरा तिने दाखवला नव्हता. 'सुरजला खूप खूप शुभेच्छा!लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट' असे कॅप्शन अंकिताने फोटोला दिले होते.
(नक्की वाचा: Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai: डोक्याला शॉट कुचकट सून तर चेटकीण-वेडी सासू, केदार शिंदेचा नवा सिनेमा येतोय भेटीला)
सुरज चव्हाचं लग्न कधी? | Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan Marriage Date
साखरपुडा, हळदी समारंभ, लग्नसोहळा सर्व गोष्टी एकाच दिवशी होणार असल्याची माहिती सुरजने स्पष्ट केले होते. पण लग्न कधी होणार आहे, याबाबत त्याने माहिती दिलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
