Shraddha Kapoor Viral Video: श्रद्धा कपूर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी ती 'स्त्री 2' सिनेमाचे मेकर्स आणि 'छावा' सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. थिएटर्समध्ये ईठा सिनेमाचे टीझरही दाखवण्यात येत आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांना तो प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर लावणी कलाकार 'विठाबाई' यांच्या भूमिकेत दिसत आहे.
'ईठा' सिनेमा पाहण्यास चाहते उत्सुक | Eatha Movie
'ईठा' हा एक आगामी बायोपिक ड्रामा सिनेमा आहे, जो प्रसिद्ध मराठी तमाशा आणि लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात त्यांचा संघर्षाने भरलेला जीवन प्रवास दाखवला जाणार आहे, जो वर्ष 1940 ते वर्ष 1990 या काळात अतिशय चर्चेत राहिला होता. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर म्हणजे 28 ऑगस्ट 2026 रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजन यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर व्यतिरिक्त अभिनेता रणदीप हुडा, मोहम्मद झीशान अयुब आणि नाना पाटेकर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.
#Eatha teaser in the theatre with #cocktail2, #ShraddhaKapoor once again proves her screen presence is unmatched pic.twitter.com/3kzN2OKB1p
— Screen & State (@screen_state) June 19, 2026
(नक्की वाचा : कठीण समय येता 'शाहरुख खान' कामास येतो! Deool Band 2 समोर होती मोठी अडचण, प्रवीण तरडेंना 'लाख'मोलाची केली मदत)
श्रद्धा कपूरचा विठाबाई नारायणगावकर अवतार
'ईठा' सिनेमाच्या टीझरमध्ये श्रद्धा कपूर गर्भवती लावणी कलाकारच्या लुकमध्ये दिसत आहे. प्रेग्नेंट असतानाही स्टेजवर लावणी सादर करतानाचे दृश्य टीझरमध्ये दिसतेय. लावणीचा कार्यक्रम सुरू असतानाच तिला प्रसूती कळा येऊ लागतात पण तरीही तिने आपले लावणी सादरीकरण सुरूच ठेवले. त्यानंतर ती स्टेजच्या मागे जाऊन बाळाला जन्म देते आणि दगडाने स्वतःच नाळही कापते.
कोण आहेत विठाबाई?
विठाबाई नारायणगावकर या एक नृत्यांगना, गायिका आणि तमाशा कलाकार होत्या, ज्यांचे संपूर्ण कुटुंबच कला क्षेत्राशी जोडलेले होते. अतिशय लहान वयात त्यांनी कोणतेही रीतसर प्रशिक्षण न घेता रंगमंचावर सादरीकरण करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या आयुष्यातील सर्वात चर्चेतील घटना म्हणजे तमाशाचा फड सुरू असतानाच त्यांनी स्टेजच्या मागे मुलाला जन्म दिला आणि काही वेळातच पुन्हा स्टेजवर येऊन घुंगरू बांधले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world