
How to Check Blood Pressure at Home: रक्तदाबाच्या समस्येमुळे हल्ली बहुतांश लोक त्रासलेले आहेत. उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाची समस्या असो, दोन्ही परिस्थितीमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे तसेच रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. वारंवार डॉक्टरांकडे जाण्याऐवजी काही लोक घरीच रक्तदाब तपासतात. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर्समुळे रक्तदाब तपासणे लोकांसाठी खूप सोपे झालंय. पण घरच्या घरी बीपी तपासत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, तरच योग्य माहिती समजेल. अन्यथा त्याचे रीडिंग देखील चुकीचे येऊ शकते. डॉ. विनोद शर्मा यांनी घरी बीपी तपासण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
घरच्या घरी बीपी तपासण्याची योग्य पद्धत ( How to Check Blood Pressure at Home। Ghari BP Kasa Check Karava)
- काही खाल्ल्यानंतर लगेचच ब्लड प्रेशर चेक करू नये. खाल्ल्यानंतर कमीत कमी दोन तासांनंतर बीपी चेक करावा.
- चहा, कॉफी, व्यायाम किंवा धूम्रपान केल्याच्या अर्ध्या तासानंतर बीपी चेक करावा.
- मूत्राशय रिकामे केल्यानंतर बीपी चेक करण्याचा सल्ला दिला जातो.
- हात टेबलवर ठेवावा किंवा झोपून रक्तदाब चेक करावा.
- ब्लड प्रेशर मशीनचे कफ अंगावरील कपड्यांवर बांधू नये, त्वचेवर बांधवे आणि त्यानंतर रक्तदाब चेक करावा.
- दोनही हातांच्या मदतीने ब्लड प्रेशर चेक करावे, ज्याद्वारे रीडिंग जास्त येईल, ते अचूक समजावे.
- पुन्हा रीडिंग घ्यायचे असेल तर पाच मिनिटांचे अंतर ठेवावे.
(नक्की वाचा: Blood Pressure High झाल्यास गरम की थंड पाण्याने आंघोळ करावी? डॉक्टरांनी सांगितला रामबाण उपाय)
बीपी कमी झाल्यास काय खावे( Low Blood Pressure Tips)
- इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पाणी
- गोड पदार्थ
- पालेभाज्या आणि फळे
- सुकामेवा आणि बिया
- प्रोटीनयुक्त पदार्थ
(नक्की वाचा: High Blood Pressure: हाय बीपीची समस्या असणाऱ्यांनी काय खाऊ नये?)
हाय बीपीची समस्या असल्यास काय खावे? (High Blood Pressure Tips)
- फळे आणि भाज्या
- अख्खे धान्य
- लो फॅट्स डेअरी प्रोडक्ट्स
- सुकामेवा आणि बिया
- मासे आणि पोल्ट्री प्रोडक्ट
- मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे
- हर्बल टी किंवा ग्रीन टी
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world