Uric Acid: शरीरामध्ये युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020मधील एका संशोधनातील माहितीनुसार, जगभरातील जवळपास 56 दशलक्ष लोक युरिक अॅसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. या समस्येमुळे किडनी आणि शरीराच्या सांध्यांवर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवरील व्हिडीओद्वारे दिलेल्या माहितीनुसार एक साधा आणि नैसर्गिक उपाय केल्यास युरिक अॅसिडच्या समस्येतून सुटका मिळू शकते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी नियमित रिकाम्या पोटी एक कप पेय प्यायल्यास युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
युरिक अॅसिडची समस्या होण्यामागील कारणं | Uric Acid Causes In Marathi
- युरिक अॅसिड म्हणजे शरीरातील टाकाऊ पदार्थ. जास्त प्रमाणात मासे, मांस किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने या समस्येचा सामना करावा लागतो.
- यासारख्या पदार्थांमध्ये प्युरिन नावाचे कम्पाउंड असते, ज्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढू लागेत.
- साधारणतः किडनी रक्तातील युरिक अॅसिड फिल्टर करून लघवीवाटे ते बाहेर फेकण्याचे काम करते.
- पण शरीरामध्ये प्युरिन कम्पाउंडची पातळी वाढल्यास किडनीच्या कार्यप्रणालीवर दुष्परिणाम होतात. परिणामी रक्तामध्ये युरिक अॅसिड जमा होऊ लागते.
- युरिक अॅसिडच्या समस्येवर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे.
युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात आणणारे ड्रिंक
युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात आणणारे ड्रिंक तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि किती प्रमाणात हे पेय प्यावे, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
सामग्री
अर्धा चमचा हळद पावडर
हळदीमध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे सांधेदुखी आणि सांध्यावरील सूज कमी होण्यास मदत मिळते.
एक चमचा धणे
धण्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील युरिक अॅसिड बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. यामुळे किडनीची कार्यप्रणाली देखील सुधारते.
अर्धा चमचा जीरे
जिऱ्यातील पोषक घटकांमुळे पचनप्रक्रिया आणि किडनीची कार्यप्रणाली देखील सुधारते .
अर्धा चमचा मेथीच्या बिया
मेथीच्या बिया शरीरासाठी नॅचरल डिटॉक्सिफायरप्रमाणे काम करते, यामुळे यकृत आणि किडनीसारखे अवयव डिटॉक्स होण्यास मदत मिळते. मेथीच्या बिया रात्रभर भिजत ठेवा.
काळी मिरी
काळ्या मिरीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे सांधेदुखीची समस्या कमी होण्यासह संपूर्ण आरोग्यास लाभ मिळतात.
(नक्की वाचा: Uric Acid Treatment: युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे, काय टाळावे; वाचा संपूर्ण यादी)
शरीरातील युरिक अॅसिड पातळी कमी करणारे ड्रिंक कसे तयार करावे?
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन कप पाणी गॅसच्या मध्यम आचेवर गरम करत ठेवा.
- पाणी गरम होऊ लागल्यास त्यामध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे, अर्धा चमचा जीरे आणि भिजवलेल्या मेथीच्या बिया मिक्स करा.
- सर्व सामग्री 10 मिनिटे गरम करत ठेवा. थोड्या वेळाने चिमूटभर काळी मिरी पावडर मिक्स करा. थोड्या वेळाने गॅस बंद करा.
- एका कपमध्ये पाणी गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास त्यामध्ये लिंबाचा रस आणि मधही मिक्स करू शकता.
ड्रिंक कधी प्यावे?
- नियमित सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिणे फायदेशीर ठरेल.
- काही दिवसांतच तुम्हाला शरीरामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
