बॉबी देओलसाठी 'हा' व्यक्ती आहे सर्वात महत्त्वाचा! ना धर्मेंद्र, ना सनी, ना आई, घेतलं 'या' खास व्यक्तीचं नाव

अभिनेता बॉबी देओल सध्या आपल्या आगामी प्रकल्पांमुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच व्हायरल झालेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या कौटुंबिक नात्यांवर भाष्य केले.

जाहिरात
Read Time: 3 mins

Bobby Deol: 'ॲनिमल' चित्रपट आणि 'आश्रम' वेब सीरिजच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या एका जुन्या मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. नुकताच तो आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजमध्ये 'अजय तलवार' या सुपरस्टारच्या भूमिकेत दिसला होता. या भूमिकेसाठी त्याचे प्रचंड कौतुक झाले. मात्र, एका मुलाखतीत बॉबीने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्याच्या आयुष्यात आई-वडिलांपेक्षाही एक व्यक्ती जास्त महत्त्वाची असल्याचे त्याने सांगितले आहे. भाऊ सनी ही त्याच्या जीवनात खास नाही हे ही यातून त्याने स्पष्ट केले आहे. त्याच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. 

सोशल मीडियावर बॉबी देओलची एक मुलाखत पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. यात त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गुपिते उघड केली आहेत. बॉबी म्हणाला की, "प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे आई-वडील प्रथम स्थानी असतात. पण माझ्यासाठी माझी पत्नी सर्वात आधी येते. याचा अर्थ असा नाही की मी माझ्या पालकांवर प्रेम करत नाही. पण ती नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे माझ्यासाठी तीच सर्वस्व आहे." बॉबीने हे विधान त्याची पत्नी तान्या देओल हिच्यासाठी केले आहे. बॉबी देओलने प्रेम विवाह केला होता. तेव्हा पासून हे या दोघांची जोडी एक दुजे के लिए अशीच आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: आनंदाच्या सहलीचा भीषण शेवट! वॉटरपार्कच्या स्लाइडनं महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त, भयंकर घडलं

बॉबी आणि तान्या देओल यांचा विवाह 1996 मध्ये झाला होता. दोघांचेही प्रेमविवाह असून त्यांची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटासारखीच रंजक आहे. तान्याला पहिल्यांदा पाहताच बॉबी तिच्या प्रेमात पडला होता. तिला इम्प्रेस करण्यासाठी बॉबी तिला सतत कार्ड्स पाठवायचा. तान्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, बॉबी तिला नेहमी विचित्र वेळी फोन करायचा. कधी मध्यरात्री फोन करून फक्त तिचा आवाज ऐकायची इच्छा व्यक्त करायचा. हळूहळू तान्यालाही तो आवडू लागला आणि दोघांनी लग्नगाठ बांधली. आज लग्नाला अनेक वर्षे झाली असून, प्रत्येक कठीण काळात ही जोडी एकमेकांचा आधार बनून राहिली आहे. ही जोडी म्हणजे मेड फॉर इच अदर असच म्हणावं लागेल. 

नक्की वाचा - 'हे बेबी'मधील चिमुकली 'एंजेल' आता झालीय ग्लॅमरस 'डिंपल गर्ल'! 18 वर्षांनंतरचा लूक पाहून चाहते थक्क

अभिनेता बॉबी देओल सध्या आपल्या आगामी प्रकल्पांमुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच व्हायरल झालेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या कौटुंबिक नात्यांवर भाष्य केले. धर्मेंद्र यांचा मुलगा असूनही बॉबीने आपल्या पत्नीला आयुष्यात पहिले स्थान दिले आहे. तान्या आणि बॉबी यांची प्रेमकथा 1996 पासून सुरू झाली होती. आजही त्यांच्यातील बाँडिंग तितकेच मजबूत असल्याचे यातून दिसून येते. बॉबी देओलने आपल्या मनातील  गोष्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. वडील धर्मेंद्र, भाऊ सनी यांच्या पेक्षा ही त्याच्या आयुष्यात महत्वाचं जर कोणी असेल तर ती त्याची पत्नी असल्याचं त्याने बेधडक पणे सांगितलं आहे. "ती माझ्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे," असे त्याने सांगितले. या दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते.

नक्की वाचा - Allu Arjun: अल्लू अर्जुनचा नवा अवतार पाहून चाहते थक्क! 'राका'चा धडकी भरवणारा लूक एकदा पाहाच


Topics mentioned in this article