Breaking
News

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, स्वत:ला केलं क्वारंटाईन

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून त्याची तब्येत बरी नव्हती. त्यानंतर अक्षय कुमारने कोविड टेस्ट केली त्यावेळी त्याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. अक्षयला कोरोना झाल्याची माहिती त्याच्या टीमने दिली आहे. 

अक्षय कुमार मागील काही दिवस आपल्या सरफिरा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त होता. प्रमोशन टीमच्या काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने अक्षयची देखील कोविड 19 टेस्ट करण्यात आली. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण

याआधी अक्षय कुमारला दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. अक्षय कुमारला पहिल्यांदा 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 2022 देखील अक्षयला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याने त्यावेळी त्याला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील सहभागी होता आले नव्हते.

(नक्की वाचा : कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त? )

अक्षयचा सरफिरा प्रेक्षकांच्या भेटीला 

अक्षय कुमारचा सरफिरा हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सन 2020 मध्ये ओटीटीवर रिलीज झालेल्या साऊथच्या 'सोरारई पोटरु' सिनेमाचा हा रिमेक आहे. यामध्ये सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत होता. मात्र सरफिरा सिनेमाला प्रेक्षकांची मिळत असलेला अल्प प्रतिसाद पाहून हा सिनेमा देखील फ्लॉप होण्याच्या वाटेवर आहे. 

( नक्की वाचा : माधुरी दीक्षितसह अनेक सेलिब्रेटींनी शेअर केलेल्या 'All Eyes On Rafah' फोटोचा अर्थ काय? )

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुधा कोंगारा दिग्दर्शित 'सरफिरा' सिनेमाची कथा स्टार्ट-अप्स आणि एव्हिएशनच्या जगावर प्रकाश टाकते. अक्षय कुमारने वीर जगन्नाथ म्हात्रे नावाची भूमिका साकारली आहे. जो ग्रामीण महाराष्ट्रातील असून भारतातील हवाई प्रवासात क्रांती घडवण्याचा संकल्प करतो. या चित्रपटात परेश रावल, राधिका मंडन आणि सीमा बिस्वास यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.

Topics mentioned in this article