Akshaye Khanna News: अभिनेता अक्षय खन्नाचा धुरंधर सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमामध्ये अक्षय खन्नाने रहमान डकैत हे पात्र साकारलंय आणि जबरदस्त अभिनय केलाय. विशेषतः अक्षय खन्नालाच पाहण्यासाठी सिनेरसिक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. बॉक्सऑफिसवर सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई सुरू आहे. दरम्यान धुरंधरच्या यशानंतर पहिल्यांदाच अक्षय खन्नाची प्रतिक्रिया समोर आलीय. अक्षय खन्नाने धुरंधरच्या यशाबाबत नेमके काय म्हटलंय, याची माहिती सिनेमाचे कास्टिंग करणाऱ्या मुकेश छाबराने दिलीय.
(नक्की वाचा: Akshaye Khanna : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमामध्ये खलनायक बनला अभिनयाचा हीरो अक्षय खन्ना, किती मिळालं मानधन? वाचा)
धुरंधर सिनेमाच्या यशावर काय म्हणाला अक्षय खन्ना?
एका मुलाखतीत मुकेश छाबराने सांगितलं की, "अक्षय खन्ना हा असा अभिनेता आहे, ज्याच्या अभिनयामध्ये कोणतीही नक्कल दिसणार नाही. तो स्वतःच्या पद्धतीने अभिनय करतो. तो भूमिकेमध्ये शिरतो". सिनेमा हिट झाल्यानंतर अक्षयशी बातचित केल्याचंही मुकेशनं सांगितलं. कास्टिंग डायरेक्टरने छाबराने सांगितलं की, "धुरंधर सिनेमाच्या यशाने त्याला फारसा फरक पडला नाही. त्याने म्हटलं की सकाळच्या वेळेस मी त्याच्याशी बोलत होतो, तो फारसा विचलित झालेला नाहीय. काम करून मजा आल्याचे त्याने सांगितलं. त्याला माहितीये की त्याने आपल्या कामाने नेमकं काय केलंय. जेव्हा मी एक-दोनदा सेटवर गेलो होतो, तेव्हा तो आपल्याच जगात हरवलेला होता. स्वतःचे सीन वाचत होता आणि स्वतःची तयारी करत होता, त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर जादू केल्याचं मला वाटतंय."
(नक्की वाचा: Dhurandhar Akshaye Khanna: गदर फेम अभिनेत्रीकडून अक्षय खन्नाचं कौतुक, म्हणाली: सर्वांचे डोळे उघडले... सर्वांना चपराक....)
धुरंधर सिनेमातील अक्षय खन्नाची भूमिका
अक्षय खन्नाने सिनेमामध्ये ल्यारी स्थिती गँगस्टर रहमान बलोच उर्फ रहमान डकैतची भूमिका साकारलीय. त्याने सिनेमामध्ये दमदार अभिनय केलाय. सिनेमातील त्याचे डायलॉग आणि सीन इतके जबरदस्त आहेत की त्याच्यावरून कोणाचीही नजर दुसरीकडे वळणारच नाही. त्याच्यावर चित्रित करण्यात आलेले Fa9la गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. अक्षय खन्नाव्यतिरिक्त रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world