- बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले
- धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना चार मुले आहेत
- धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी, 70च्या दशकात दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले
Actor Dharmendra: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या आता केवळ आठवणी राहिल्या आहेत. 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांचे निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन पत्नी आणि मुलांसह मोठा परिवार आहे. दुसरी पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबतची त्यांची प्रेमकहाणी अतिशय अनोखी होती. धर्मेंद्र आणि हेमा यांचे काही खास फोटो पाहुया...

धर्मेंद्र विवाहित असूनही ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. हेमा देखील त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या, त्यांचं लग्न झालंय या गोष्टीने ड्रीम गर्लला फारसा फरक पडला नव्हता.

हेमा मालिनींना पसंत करणाऱ्यांच्या यादीमध्ये धर्मेंद्र यांच्यासह जितेंद्र आणि संजीव कुमार यांच्याही नावाचा समावेश होता. पण हेमा मालिनींचे फक्त धर्मेंद्र यांच्यावर प्रेम होते आणि दोघांनाही लग्न करायचे होते.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 70च्या दशकात कित्येक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले. धर्मेंद्र यांनी कथित स्वरुपात धर्म बदलून हेमा मालिनी यांच्यासोबत 1980मध्ये लग्न केलं होतं, पण त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नाही.

शोले, ड्रीम गर्ल, आस पास, प्रतिज्ञा, शराफत, चरस, रजिया सुल्तान, सीता और गीता, पत्थर और पायल, तू हसीन मैं जवान, राजा जानी आणि द बर्निंग ट्रेन यासारख्या कित्येक सिनेमांमध्ये धर्मेंद्र-हेमा यांनी एकत्र काम केलं.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनीमधील प्रेमसंबंधांच्या चर्चा बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. पण या दोघांनी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता लग्नापूर्वी तसेच लग्नानंतर कित्येक सिनेमांमध्ये काम केलं.

धर्मेंद्र त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना चार मुलं आहेत. लग्नानंतर हेमा मालिनींनी वेगळं राहणं पसंत केलं.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा - अहाना देओल या दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांची दोन कुटुंब कधीच एकत्र दिसली नाहीत.

हेमा मालिनी यांनी प्रकाश कौर आणि त्यांच्या मुलांचा कायम आदर केला.

धर्मेंद्र यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयासह सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world