Kartik Aaryan: कार्तिक आर्यन बनला 'अलिबागकर'; प्रसिद्ध प्रकल्पात घेतली इतक्या कोटींची जमीन

कार्तिक आर्यनने या गुंतवणुकीबद्दल बोलताना सांगितले की, "अलिबाग हे मुंबईजवळ गुंतवणुकीसाठीएक उत्तम ठिकाण बनले आहे. मी तिथे माझे स्वतःचे घर बांधण्याचा विचार करत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अलिबागमध्ये कोट्यवधींची जमीन खरेदी केली आहे. त्याने पहिल्यांदाच जमीन खरेदी केली असून, अलिबागमध्ये ‘Chateau de Alibaug' या प्रकल्पात 2000 स्क्वेअर फूटचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. हा भूखंड ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' या कंपनीचा आहे. यासोबतच, कार्तिकने अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनन यांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. कारण या दोघांनीही याच कंपनीच्या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे.

कार्तिक आर्यनने या गुंतवणुकीबद्दल बोलताना सांगितले की, "अलिबाग हे मुंबईजवळ गुंतवणुकीसाठीएक उत्तम ठिकाण बनले आहे. मी तिथे माझे स्वतःचे घर बांधण्याचा विचार करत आहे. पहिल्यांदाच मी जमिनीमध्ये गुंतवणूक केली आहे आणि मला 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. या गुंतवणुकीचा मला आनंद आहे."

(नक्की वाचा-  Lalbaugcha Raja 2025: मिया खलिफालाही दर्शनाला बोलवा! लालबागचा राजाच्या VIP दर्शनावर Insta Influencer संतापला)

'शॅटो डे अलिबाग' हा प्रकल्प हिरव्यागार निसर्गाने वेढलेला आहे. या ठिकाणी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे इथले जीवनमान खूप आलिशान बनेल. या सुविधांमध्ये छतावरील बाग, लाउंज रूम, रिफ्लेक्सोलॉजी ट्रॅक, पूल डेक, बहुउद्देशीय हॉल आणि दोन क्लबहाऊसचा समावेश आहे. या सुविधांमुळे रहिवाशांना मनोरंजन आणि सामुदायिक उपक्रमांसाठी उत्तम जागा मिळेल.

अभिनंदन लोढा यांनी कार्तिकचे स्वागत करताना म्हटले की, "आमचा 'शॅटो डे अलिबाग' हा अलिबागमध्ये पहिला ब्रँडेड भूखंड विकास प्रकल्प होता. कार्तिकची गुंतवणूक दर्शवते की अलिबाग हे मुंबईकरांसाठी आलिशान आणि प्रशस्त घरे बांधण्यासाठी एक पसंतीचे ठिकाण बनत आहे. याआधी अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनन यांनीही इथे गुंतवणूक केली आहे."

(नक्की वाचा : Rahul Deshpande : धक्कादायक! गायक राहुल देशपांडे यांचा 17 वर्षांनी घटस्फोट, भावुक घोषणा करताना म्हणाले... )

सेलिब्रिटींच्या गुंतवणुकीचे केंद्र बनले अलिबाग

गेल्या काही वर्षांत अलिबाग हे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योजकांसाठी एक पसंतीचे ठिकाण बनले आहे. मुंबईपासून जवळ असल्यामुळे आणि रो-रो फेरी तसेच इतर कनेक्टिव्हिटीमुळे इथे पोहोचणे सोपे झाले आहे. अमिताभ बच्चन यांनी गेल्या वर्षी 10000 स्क्वेअर फूटचा भूखंड 10 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर क्रिती सेनननेही 'सोल डे अलिबाग' या प्रकल्पात 2000 स्क्वेअर फूटची जमीन घेतली. आता कार्तिक आर्यनच्या या गुंतवणुकीमुळे अलिबागचे महत्त्व आणखी वाढले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article