
Singer Rahul Deshpande Divorce News : पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. तब्बल 17 वर्षांच्या संसारानंतर त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाला आहे. याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे दिली आहे. त्यांचा कायदेशीर घटस्फोट सप्टेंबर 2024 मध्येच पूर्ण झाला होता, पण त्यांनी ही गोष्ट आता जाहीर केली आहे.
काय आहे पोस्ट?
राहुल देशपांडे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करताना सांगितले की, "माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझ्या सोबत आहात, त्यामुळेच ही वैयक्तिक माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे. 17 वर्षांच्या लग्नानंतर मी आणि नेहाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे." त्यांनी पुढे म्हटले की, "ही प्रक्रिया खाजगीरित्या हाताळण्यासाठी आम्ही वेळ घेतला, जेणेकरून हे सर्व व्यवस्थितपणे पूर्ण होईल. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ती आमची मुलगी रेणुका."
गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये आपल्या मुलीबद्दलची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "रेणुका माझ्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाची राहील आणि मी एक सह-पालक म्हणून तिला भरभरून प्रेम आणि आधार देत राहीन. हा निर्णय आमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करत असला तरी, पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर कायम राहील."
राहुल देशपांडे हे 'कट्यार काळजात घुसली' या नाटकातील भूमिकेमुळे आणि 'मी वसंतराव' या चित्रपटातील भूमिकेमुळे खूप लोकप्रिय आहेत. या चित्रपटातील त्यांच्या कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
राहुल आणि नेहा यांच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी अनपेक्षित असल्याचं मानलं जातंय.. या कठीण काळात त्यांच्यावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावरून पाठिंबा देत आहेत. या पोस्टवर त्यांच्या फॅन्सनी कमेंट करून राहुल यांच्या या निर्णयाचा आदर करत त्यांना पाठिंबा दिला आहे.
( नक्की वाचा : Dhanashree Verma : 'मी फक्त रडत होते, ओरडत होते', धनश्री वर्मानं सांगितला चहलसोबतच्या घटस्फोटाचा अनुभव )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world