जाहिरात

Pankaj Tripathi New Home: अभिनेते पंकज त्रिपाठींनी मुंबईत खरेदी केले 2 फ्लॅट्स; किंमत ऐकून थक्क व्हाल!

पंकज त्रिपाठी आणि त्यांची मुलगी आशी त्रिपाठी यांनी मिळून अंधेरी पश्चिम भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.

Pankaj Tripathi New Home: अभिनेते पंकज त्रिपाठींनी मुंबईत खरेदी केले 2 फ्लॅट्स; किंमत ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी मुंबईत दोन आलिशान अपार्टमेंट्स खरेदी केल्या आहेत. या मालमत्तांची एकूण किंमत सुमारे 10.85 कोटी आहे. मुंबईतील रिअल इस्टेट बाजार सध्या विक्रमी वेग पकडत असतानाच त्रिपाठी कुटुंबीयांनी ही मोठी गुंतवणूक केली आहे.

पंकज त्रिपाठी आणि त्यांची मुलगी आशी त्रिपाठी यांनी मिळून अंधेरी पश्चिम भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत 9.98 कोटी रुपये आहे. कागदपत्रांनुसार, या घराचा 'रेरा कारपेट एरिया' 188.22 चौरस मीटर म्हणजे सुमारे 2,026 चौरस फूट आहे. तसेच याला 32.14 चौरस मीटरची बाल्कनी मिळाली आहे. यात तीन कार पार्किंग जागांचाही समावेश आहे. हा व्यवहार जुलै 2025 मध्ये नोंदणीकृत झाला. यासाठी त्रिपाठी कुटुंबाने 59.89 लाख इतके मुद्रांक शुल्क आणि 30,000 नोंदणी शुल्क भरले.

(नक्की वाचा-  Gaurav More Home: गौरव मोरेचं 1.78 कोटींचं अलिशान घर कसं आहे? पाहा VIDEO)

कांदिवलीत दुसरी प्रॉपर्टी

याशिवाय, पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुला त्रिपाठी आणि मुलगी आशी त्रिपाठी यांनी कांदिवली पश्चिम येथेही एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. या मालमत्तेची किंमत 87 लाख रुपये आहे. याचा रेरा कारपेट एरिया 39.48 चौरस मीटर म्हणजे सुमारे 425 चौरस फूट आहे. हा व्यवहार सप्टेंबर 2025 मध्ये नोंदणीकृत झाला असून, यासाठी 4.35 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले.

पंकज त्रिपाठी संध्या कुठे राहतात?

दोन आलिशान अपार्टमेंट्स खरेदी केल्या असल्या तरी, पंकज त्रिपाठी यांचे जुने आणि शांत ठिकाण आजही त्यांच्या हृदयाजवळ आहे. पंकज त्रिपाठी हे सध्या मुंबईच्या मढ बेटावरील समुद्रकिनाऱ्याजवळील घरी राहतात. 'रूप कथा' असं त्यांच्या घराचं नाव आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com