जाहिरात

Actor Dharmendra Passes Away: बॉलिवूडचा ही-मॅन हरपला! दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन

Dharmendra Passes Away: वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहा दशके बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Actor Dharmendra Passes Away: बॉलिवूडचा ही-मॅन हरपला! दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन

Bollywood Actor Dharmendra Passes Away: हिंदी सिनेविश्वातून एक दुःखद  बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती अत्यावस्थ होती. 11 नोव्हेंबर रोजी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते, त्यांना डिस्चार्जही मिळाला होता. आज त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहा दशके बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे, मात्र त्यांच्या कुटुंबियांकडून अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. 

सहा दशके सिनेविश्व गाजवले!

धर्मेंद्र यांचा जन्म  8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील नसराली येथे झाला आणि 1958 मध्ये फिल्मफेअर टॅलेंट हंट जिंकल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 1960 आणि 1970 च्या दशकात ते रोमँटिक आणि अॅक्शन हिरो म्हणून एक मोठे स्टार बनले आणि नंतर त्यांना बॉलीवूडचा महानायक म्हणून ओळखले जाऊ लागले.

धर्मेंद्र यांनी सहा दशके हिंदी सिनेविश्वावर राज्य केले. 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सुरुवातीच्या काळात 'अनपढ़', 'बंदिनी', 'अनुपमा' आणि 'आया सावन झूम के' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर  त्यांनी शोले, चुपके, चुपके सत्यकाम, सीता और गीता, यमला पगला दिवाना, अपने तो अपने होते है सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या. 

Hema Malini Net Worth : धर्मेंद्र की हेमा मालिनी, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? पैशांचा आकडा वाचून थक्कच व्हाल

अभिनेते धर्मेंद्र यांच्या अभिनयाइतकेच त्यांचे डायलॉगही प्रचंड गाजले.प्रामुख्याने 'शोले', 'धरम वीर', 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'अनुपमा', 'मेरा गाँव मेरा देश' आणि 'ड्रीम गर्ल' यांसारख्या दमदार आणि सुपरहिट चित्रपटांमधील त्यांनी निभावलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील.

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. धर्मेंद्र यांच्यावर विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महानायक अमिताभ बच्चन, सलीम खान,आमिर खान यांच्यासह बॉलिवूड जगतातील दिग्गज अभिनेते, अभिनेत्री धर्मेंद्र यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. 

Dharmendra News: अभिनयात जमलं नसतं तर धर्मेंद्रने केलं असतं हे काम! बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा Plan B माहीती आहे?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com