Salman Khan Weight Loss News: आजारपण की आणखी काही? सलमान खानचे अचानक 16 Kg वजन का कमी झाले, अखेर सत्य समोर

Salman Khan Weight Loss News: सलमान खानचे अचानक 16 किलो वजन का कमी झाले? आजारपणाच्या चर्चांनंतर सोहेल खानच्या 'अलायन्स' रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर भाईजानने स्वतःबाबत मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Salman Khan Weight Loss News: सलमान खानचे वजन कमी होण्यामागील खरे कारण समोर"
Salman Khan Instagram And Gemini AI

Salman Khan Weight Loss News: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कायम कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच बदलेल्या लुकमुळे दबंग खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कमी झालेले वजन आणि अशक्त दिसत असल्याने सलमानची चाहत्यांना काळजी वाटू लागली होती. सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी सलमान खानने स्वतःचे काही फोटो शेअर केले. तुम्हा सर्वांची तब्येत कशी आहे? असे कॅप्शनही त्यानं फोटोंना दिले होते. यानंतर सलमानच्या आरोग्याबाबत सुरू असलेली चर्चा तर थांबली पण भाईजानचे वजन का कमी होत आहे? हा प्रश्न लोकांच्या मनात कायम होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर इतक्या दिवसांनंतर रिअ‍ॅलिटी शो 'अलायन्स'च्या सेटवर मिळाले, जिथे सलमान भाऊ सोहेलला भेटण्यासाठी पोहोचला होता.

(नक्की वाचा : Salman Khan Post: शाहरुख किंवा आमीर नव्हे या सुपरस्टारला सलमान खानने म्हटले 'बडा भाई', शेअर केले खास फोटो)

Advertisement

सोहेल-सलमानच्या भेटीत समोर आले सीक्रेट

सलमान खान अलीकडेच भाऊ सोहेल खानची भेट घेण्यासाठी 'अलायन्स'च्या सेटवर पोहोचला होता. सोहेलजवळ पोहोचल्यानंतर त्याने सलमानला आपले शर्ट वर करून घटलेले वजन दाखवले. यावर सोहेल सोबतचे स्पर्धक म्हणाले की त्याचे 12 किलोग्रॅम वजन कमी झाले आहे. तर सलमान खान म्हणतो की मी 16 किलोग्रॅम वजन कमी केले आहे. सलमान खानच्या या नव्या खुलाशामुळे भाईजान कोणत्याही आजारपणामुळे अशक्त झालेला नाहीय तर हे ट्रान्सफॉर्मेशन त्याने स्वतःच्या एका आगामी सिनेमासाठी केले आहे.

सलमान खानचा आगामी सिनेमा चर्चेत

सलमान खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा मातृभूमी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याव्यतिरिक्त 'किक 2' सिनेमावरही काम सुरू आहे. याव्यतिरिक्त असे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्यासाठी सलमान खान स्वतःला फिट ठेवत आहे.