जाहिरात

सलमान खानच्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर ते लीड अ‍ॅक्ट्रेस... या अभिनेत्रीला ओळखलं का?

डेझी शहा असं या अभिनेत्रीचं नाव आहे. डेझी शहा आणि सलमान खान 'जय हो' या सिनेमात एकत्र दिसले होते. अभिनेत्री म्हणून सिनेमात झळकण्याआधी डेझी शहा कोरिओग्राफर आणि मॉडलिंग करत होती.  

सलमान खानच्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर ते लीड अ‍ॅक्ट्रेस... या अभिनेत्रीला ओळखलं का?

बॅकग्राऊंड डान्सर ते अभिनेता असा प्रवास असलेले शाहीद कपूर आणि सुशांत सिंह राजपूत हे सर्वांनाच माहीत आहेत. मात्र असाच प्रवास बॉलिबूडमधील एका अभिनेत्रीचा आहे. सलमान खानच्या 'तेरे नाम' सिनेमातील 'लगन लगी...' गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सुरुवात केलेली अभिनेत्री सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यानंतर सलमान खान सोबतच प्रमुख अभिनेत्री म्हणून तिने भूमिका साकारली होती.

सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणे अनेक अभिनेत्रीचं स्वप्न असतं. मात्र या अभिनेत्री कमी वेळेत हे यश मिळवलं. डेझी शहा असं या अभिनेत्रीचं नाव आहे. डेझी शहा आणि सलमान खान 'जय हो' या सिनेमात एकत्र दिसले होते. अभिनेत्री म्हणून सिनेमात झळकण्याआधी डेझी शहा कोरिओग्राफर आणि मॉडलिंग करत होती.  

सलमान खानची हिरोईन बनण्याआधी डेझी शहा बॅकग्राऊंड डान्सर होती. कोरिओग्राफर म्हणूनही तिने काम केलं होतं. सलमान खानचा प्रसिद्ध सिनेमा तेरे नामच्या 'लगन लगी...' आणि 'ओ जाना...' गाण्यामध्ये तिने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं.



 

डेझी शहाने प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यसोबत असिस्टंट कोरिओग्राफर म्हणूनही काम केलं आहे. मात्र 2014 मधील जय हो सिनेमामुळे डेझी शहाला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. त्यानंतर डेझी शहाने हेट स्टोरी 3 आणि रेस 3 सारख्या सिनेमांमध्ये झळकली. 

साऊथ आणि गुजराती सिनेमांमध्येही अभिनय

जय हो सिनेमांच्या आधी डेझी शाह साऊथच्या सिनेमांमध्येही नशिब आजमावलं होतं. 2011 मध्ये डेझीने कन्नड सिनेमा भद्रा आणि बॉडीगार्डमध्येही काम केलं होतं. डेझीने अभिनेत्री म्हणून या सिनेमांमधून सुरुवात केली होती. त्यानंतर डेझीने 'गुजरात 11' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाही प्रेक्षकांची पसंती मिळाली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Phullwanti Trailer Out: 'फुलवंती'ला मिळणार का न्याय? सिनेमाचा दमदार ट्रेलर लाँच
सलमान खानच्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर ते लीड अ‍ॅक्ट्रेस... या अभिनेत्रीला ओळखलं का?
hibox app scam case delhi police issued notice to actress rhea chakraborty latest update
Next Article
HIBOX App Scam: अभिनेत्री रिया चक्रवर्तीची अडचण वाढणार? 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची नोटीस