बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांना तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 79 वर्षीय सुभाष घई यांना श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा आणि वारंवार चक्कर येणे यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुभाष घई यांना बुधवारी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना लवकरच आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवले जाईल, अशी अपेक्षा आहे.
(नक्की वाचा - Allu Arjun Charged : अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?)
कोण आहेत सुभाष घई?
सुभाष घई यांनी 'राम लखन', 'कर्म', 'सौदागर' या सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय शाहरुख खानला 'परदेस' सारख्या चित्रपटातून इंडस्ट्रीत स्टार म्हणून ओळख मिळवून दिली.
(नक्की वाचा- Pushpa 2 : रिलीजपूर्वी पुष्पा 2 ने दिला चाहत्यांना धोका, काय आहे कारण; जाणून घ्या)
त्यांचे 'ताल' आणि 'युवराज' या सारखे चित्रपट देखील गाजले. सुभाष घई यांनी नुकतीच 'ऐतराज 2' आणि 'खलनायक 2' बद्दलही चर्चा केली होती. या चित्रपटांचे सिक्वेल बनवण्याची कल्पना त्यांनी व्यक्त केली होती. ज्यामध्ये त्यांनी जुन्या स्टार्सच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत बोलले होते.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world