अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पुष्पा 2 सिनेमाला सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्लु अर्जुनच्या पुष्पा 2 ने आतापर्यंत बाहुबली, केजीएफ, कल्की 2898 एडी, पठाण, जवान आणि आरआरआरसह अनेक चित्रपटांना अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मागे टाकलं आहे. दरम्यान, अल्लु अर्जुनच्या थ्रीडी चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पुष्पा 2 चित्रपटगृहांमध्ये 3D व्हर्जनमध्ये प्रदर्शित होणार नाही. थ्रीडी व्हर्जनसाठी प्रेक्षकांना जवळपास आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे.
नक्की वाचा - 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवा रेकॉर्ड; तिकिटाची किंमत चक्क 3000च्या घरात!
बॉलिवूड हंगामा या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, पुष्पा 2 ची 3D व्हर्जन अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी या आठवड्यात चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट देशभरात आणि जगभरातील विविध भाषांमध्ये फक्त 2D व्हर्जनमध्ये दाखवला जाईल. निर्मात्यांनी आता 3D व्हर्जन पुढील शुक्रवारी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत थ्रीडी प्रिंट तयार होतील. मात्र, अद्याप याविषयी पुष्पा 2 च्या निर्मात्यांकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
नक्की वाचा - विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 'या' तारखेला होणार रिलीज, का बदलली रिलीज डेट?
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा 2 चा बजेट साधारण 500 कोटी रुपयांपर्यंत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2021 मध्ये आला होता आणि हा चित्रपट अवघ्या 150 कोटींमध्ये तयार झाला होता. पहिल्या चित्रपटाने जगभरात 350 कोटींचा कलेक्शन केला होता. सुकुमारने पुष्पा 2 या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world