71 वर्षांचा अभिनेता, 68 वर्षीय धाकट्या भावाचे उचलतोय सर्व खर्च, म्हणाला-माझ्या पत्नीनंही कधी काही विचारलं नाही

Bollywood News: ज्येष्ठ अभिनेत्याने धाकट्या भावासोबतच्या नात्यावर जाहीरपणे भाष्य केले आहे. कोट्यवधींची संपत्ती असूनही ते भाड्याच्या घरात का राहतात, याचे कारण त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Bollywood News: 71 वर्षांचा मोठा भाऊ 68 वर्षीय धाकट्या भावाचा संपूर्ण खर्च उचलतो, कारण..."

Bollywood News: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अलीकडेच धाकटा भाऊ राजू खेर यांच्यासोबतचा एका भावुक किस्सा शेअर केला आहे. 500 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलेले अभिनेते अनुपम खेर यांनी सांगितले कि, ते अनेक वर्षांपासून आपल्या भावाची काळजी घेत आहेत आणि त्यांनी आपली पत्नी तसेच अभिनेत्री किरण खेर यांचे याबाबत आभार मानले. कारण त्यांनी कधीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला नाही. ऋचा यांच्यासोबत 'जिंदगी' या युट्यूब शोमध्ये संवाद साधताना अनुपम खेर यांनी कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे महत्त्व सांगत आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला.

धाकट्या भावाचे चेक अनुपम खेर साइन करतात

भावाची काळजी घेण्याबाबत अनुपम खेर (Anupam Kher) म्हणाले, मी राजूचे घरखर्च आणि इतर गोष्टींचे चेक साइन करतो. मी माझ्या मॅनेजरला खूप आधीच सांगितले होते, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव की मी माझ्या भावाला किती रुपये देतो, हे मला कधीही विचारू नकोस. मला किरणचेही कौतुक करायला हवे कारण तिने मला कधीही हे विचारले नाही की, 'तू तुझ्या भावासाठी एवढं सगळं का करतोस?' येथूनच तर अडचणी सुरू होतात.

Advertisement

लहान भावाचा खर्च अनुपम खेर उचलतात, कारण....

पुढे ते म्हणाले,"जर प्रत्येक भावाने हे लक्षात ठेवले की ते बालपणात कसे होते, तर त्यांच्यात कधीच कोणतेही भांडण होणार नाही. मी माझ्या आयुष्याकडे एका सिनेमासारखे पाहतो. आपण एकत्र मोठे झालो आहोत हे मी कसे विसरू शकतो? आमचे आई-वडील एकच आहेत. माझ्या भावाला कधीही माझा हेवा वाटला नाही की मी त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी आहे. या बाबतीत तो खरोखरच कमाल आहे." पुढे अनुपम खेर यांनी या गोष्टीचाही पुनरुच्चार केला की, भाड्याच्या घरात राहण्याचे त्यांचे एक कारण हे देखील होते की एखाद्या घरात दोन भावांना जमीन-संपत्तीसाठी एकमेकांचा जीव घेताना पाहणे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक असायचे.

(नक्की वाचा : Salman Khan: 'माझ्या नुकसानीतून कमवायचे असेल तर...' हॉस्पिटलबाहेर नेमके काय घडलं? सलमान खानने दिला कडक इशारा)

भाड्याच्या घरात राहण्याबाबत अनुपम खेर यांनी सांगितली ही गोष्ट

ऋचा यांच्यासोबतच्या संभाषणात अनुपम खेर यांनी करिअरच्या सुरुवातीला जेव्हा ते फक्त 37 रुपये घेऊन मुंबईत आले होते, त्या आठवणींनाही उजाळा दिला. तसेच इतकी वर्षे इंडस्ट्रीत असूनही घर न खरेदी करण्याच्या निर्णयावर ते म्हणाले की, हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे आणि आर्थिक अडचणींमुळे घेतलेला नाही. अनुपम खेर म्हणाले, किरण आणि मी दुसऱ्या ठिकाणी गेलो, आम्हाला घर शोधायला 4 वर्षे लागली, त्यानंतर ती खासदार (MP) झाली आणि चंदीगडला शिफ्ट झाली. एका टप्प्यावर मी विचार केला की आम्ही घर शोधण्यात इतका वेळ का घालवला. मग आम्ही साध्या पद्धतीने राहण्याचा निर्णय घेतला.

(नक्की वाचा: दूरदर्शनने पहिलाच शो नाकारला, ती झाली बॉलिवूडची सुपरस्टार; लग्नानंतर 8 वर्ष ब्रेक, आजही सौंदर्याने लावते वेड)

अनुपम खेर यांचे आगामी सिनेमे

अनुपम खेर यांचा आगामी सिनेमा प्रशांत बागिया दिग्दर्शित 'खोसला का घोसला 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'खोसला का घोसला' या सिनेमाचा सीक्वेल आहे. यामध्ये रणवीर शोरे, प्रवीण डबास, किरण जुनेजा आणि बोमन इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 28 ऑगस्ट 2026 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

Advertisement