
Aishwarya Rai News: ऐश्वर्या राय-बच्चनच्या सौंदर्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील इतकी ती सुंदर आहे. तिची एक झलक चाहत्यांना घायाळ करते. ऐश्वर्यासमोर आजही बॉलिवूड कित्येक अभिनेत्री फिक्या पडतील. ऐश्वर्याचे कधीही न पाहिलेले कित्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या लेखाद्वारे आपण ऐश्वर्याचे असेच काही सुंदर फोटो पाहणार आहेत, ते पाहून तुम्ही नक्की म्हणाल की ऐश्वर्या रायमध्ये तिच्या आईचीच छबी दिसतेय.

या फोटोमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याचे तिच्या आईसोबत खूप फोटो पाहायला मिळतील. व्हायरल फोटोंमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यानच्या फोटोंचा समावेश आहे.

ऐश्वर्या राय आईसोबत केक कापत असतानाचाही फोटो व्हायरल झालाय.

ऐश्वर्याच्या क्युटनेसवर चाहते फिदा आहेत. तरुण वयातील तसेच मिस वर्ल्ड स्पर्धेनंतरच्याही कित्येक फोटोंमध्ये मायलेकीचे खास नाते कायम चाहत्यांना पाहायला मिळाले.

ऐश्वर्या सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर करत असते. ऐश्वर्यामध्ये तिच्या आईचीच प्रतिमा दिसत असल्याची प्रतिक्रिया चाहते व्यक्त करतात.

ऐश्वर्या आणि तिच्या आईमध्ये जसे बॉडिंग पाहायला मिळायचे, तसेच नाते ऐश्वर्या आणि तिची लेक आराध्यामध्ये वारंवार दिसत असते.

ऐश्वर्या रायचा वाढदिवस 1 नोव्हेंबरला असतो. ऐश्वर्याचा जन्म कर्नाटकमध्ये झालाय.

ऐश्वर्याने वर्ष 1994 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचा किताब जिंकला होता. सिनेसृष्टीतील करिअरमध्ये तिने 45 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय.

ऐश्वर्याने आर्किटेक्ट विषयात पदवी संपादित केली आणि यानंतर तिने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल टाकलं.

तमिळ भाषिक सिनेमांद्वारे तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. 1997 मध्ये झळकलेल्या इरुवर सिनेमाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world