
बॉलिवूड आणि हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता अली फजल एका नव्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याने नुकताच एक खुलासा केला असून, 'फास्ट अँड फ्युरियस 7' या चित्रपटातील लहानशा भूमिकेसाठी त्याला आजही मानधन मिळते, असे त्याने सांगितले आहे.
'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत अली फजलला 'फास्ट अँड फ्युरियस 7' चित्रपटाबद्दल विचारले असता, तो म्हणाला, "माझी भूमिका लहान होती, पण मी या चित्रपटातून खूप पैसे कमावले आहेत. कारण त्याची रॉयल्टी मला आजही मिळते." तो पुढे म्हणाला की, "जेव्हा जेव्हा हा चित्रपट जगातील कोणत्याही ठिकाणी प्रदर्शित होतो, तेव्हा त्याचा एक छोटासा चेक मला येतो."
(नक्की वाचा- 41 वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत नव्याने आली होती आलिया भट्टच्या मम्मी, तुम्ही त्यांना ओळखलं का?)
या संदर्भात त्याने 'हॅरी पॉटर'च्या स्टंटमनचे उदाहरण दिले. "हॅरी पॉटरमधील स्टंटमनला आजही दरवर्षी हजारो पौंडमध्ये चेक मिळतात आणि हे त्याला आयुष्यभर मिळत राहतील," असेही त्याने सांगितले.
हॉलीवूडसोबतच चिनी चित्रपटातही काम
अली फजलने फक्त हॉलीवूडमध्येच नाही, तर एका चिनी चित्रपटातही काम केल्याचा खुलासा केला. त्याने सांगितलं की, त्याने चिनी चित्रपटात एक छोटासा रोल केला होता. तो मी आजपर्यंत पाहिलेला नाही. पण त्या कामासाठी मला चांगले पैसे मिळाले होते."
'मिर्झापूर 4' ची प्रेक्षकांना उत्सुकता
अली फजलकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. पण त्याचे चाहते 'मिर्झापूर 4' या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. चौथ्या सीझनमध्ये अनेक अनपेक्षित वळणे येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world