Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची लालबागच्या राजाबद्दल पोस्ट अन् मराठीचा मुद्दा, भाषेबाबत म्हणाले...

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे मराठी भाषेसंदर्भातील पोस्ट चर्चेत, नेमके काय लिहिलंय?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांचे लालबागच्या राजाबाबत ट्वीट"

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2025) आणि मराठी भाषेसंदर्भात केलेले सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आहे. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी बिग बींनी लालबागचा राजाशी संबंधित पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केले. यावरून नेटकऱ्यांमध्ये मराठी भाषेवरुनही चर्चा सुरू झाली. चर्चेदरम्यान अमिताभ बच्चन यांनी मराठी भाषा येत नसल्याची कबुली दिली. नेमके काय आहे प्रकरण जाणून घेऊया...

बिग बी यांनी लालबागचा राजाबाबत सोशल मीडियावर काय पोस्ट केले?| Amitabh Bachchan X Post On Lalbaugcha Raja

अमिताभ बच्चन यांनी 7 सप्टेंबर रोजी "T 5494 - गणपति बप्पा मोरया  🙏🙏 लाल बाग च राजा  !!!" या कॅप्शनसह बाप्पाचा फोटो पोस्ट केला. त्यावर एका व्यक्तीने बिग बींना शब्दामधील चूक निदर्शनास आणून दिली. त्यांनी पोस्टमधील चूक दुरुस्त करुन माफी देखील मागितली. याबाबत बिग बींनी म्हटलं की, "एका शुभचिंतकाने मला सांगितलं की, ट्वीटमध्ये चुकीचा शब्द लिहिला, तो मी दुरुस्त करत आहे. मी लिहिले होतं 'लालबाग 'च' राजा', त्यांनी म्हटलं की 'लालबागचा राजा' असे असावे म्हणून दुरुस्त करत आहे". 

(नक्की वाचा: Amitabh Bachchan Son In Law: अमिताभ बच्चन यांच्या जावयाचे 10 न पाहिलेले फोटो, श्वेता बच्चनची अनोखी प्रेमकहाणी)

(नक्की वाचा: KBC17 : काळी मिरीच्या प्रश्नामुळे 1 कोटी हुकले; तुम्हाला उत्तर माहितीये का? चेक करा)

बिग बी यांचे आणखी एक मराठी भाषेतून पोस्ट? 

"कोणीतरी मला सांगितले की तुला मराठी येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबईत राहतोस. हे खरे आहे, पण ते शिकण्याचा प्रयत्न कर, हे शिकणे देखील एक सलाम आहे. 🙏" अशा आशयाचंही एक पोस्ट बिग बी यांनी केलंय. 

मराठी भाषा येत नसल्याची कबुली देत बिग बींनी भाषा शिकणार असल्याचंही सांगितलं. 

अमिताभ बच्चन यांच्या मराठी भाषा शिकण्याबाबतच्या पोस्टवर काही युजर्संनी खंत व्यक्त केलीय तर काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Photo Credit: Amitabh Bachchan FB

छान प्रयत्न आहे सर, असे म्हणत सतीश चौधरी, अर्चना चंद्रसेन, परेश तेरेदेसाई या युजर्संनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

Photo Credit: Amitabh Bachchan FB

Photo Credit: Amitabh Bachchan FB