जाहिरात

Hema Malini Networth: धर्मेंद्र की हेमा मालिनी, सर्वाधिक श्रीमंत कोण? किती आहे ड्रीम गर्लचं एकूण नेटवर्थ

Hema Malini Networth: धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती किती आहे? दोघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे?

Hema Malini Networth: धर्मेंद्र की हेमा मालिनी, सर्वाधिक श्रीमंत कोण? किती आहे ड्रीम गर्लचं एकूण नेटवर्थ
Hema Malini Networth: धर्मेंद्र कि हेमा मालिनी कोण आहे सर्वात श्रीमंत?

Hema Malini Networth: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. आवडत्या कलाकाराचे अंतिम दर्शन न मिळाल्यानं चाहतेही दुःखात आहेत. धर्मेंद्र यांनी त्यांच्या पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी दोघींवरही सारखेच प्रेम केलं. धर्मेंद्र पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासह स्वतःच्या फार्महाऊसवर राहते होते. तर हेमा मालिनी यांनी लग्नानंतर वेगळ्या घरामध्ये राहणं पसंत केले होतं. दोन्ही पत्नींसाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या. दरम्यान धर्मेंद्र की हेमा मालिनी यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण तसेच कोणाकडे किती संपत्ती आहे, जाणून घेऊया...

Pune News: पुण्याशी धर्मेंद्र आणि त्यांच्या शेवटचा सिनेमा इक्कीसचं खास कनेक्शन, NDTVला दिग्दर्शकाने सांगितलं की थकवा...

(नक्की वाचा: Pune News: पुण्याशी धर्मेंद्र आणि त्यांच्या शेवटचा सिनेमा इक्कीसचं खास कनेक्शन, NDTVला दिग्दर्शकाने सांगितलं की थकवा...)

हेमा मालिनी यांचे नेटवर्थ | Hema Malini Networth 

धर्मेंद्र यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द सुपरहिट राहिलीय, त्यांच्या गाजलेल्या सिनेमांची यादी भलीमोठी आहे. पण माझे चाहतेच माझी खरी संपत्ती आहे, असे धर्मेंद्र वारंवार म्हणायचे. चाहत्यांमध्ये धर्मेंद्र ही-मॅन तर त्यांची पत्नी हेमा मालिनी 'ड्रीम गर्ल' या नावाने प्रसिद्ध होते. दोघंही त्यांच्या काळातील सुपरस्टार होते. अभिनयासह दोघांनी राजकारणामध्येही प्रवेश केला. प्रकृती खालावण्यापूर्वीही धर्मेंद्र कलाविश्वामध्ये सक्रिय होते. 

दोघांच्या संपत्तीबाबत सांगायचे झाले तर 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार हेमा मालिनी यांची एकूण मालमत्ता अंदाजे 129 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे सात आलिशान गाड्याही आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे सुमारे 3 कोटी रुपये किंमतीची वडिलोपार्जित जमीन आहे. बँक खात्यामध्ये 13 लाख रुपये जमा आहेत. मुंबई आणि मथुरा शहरामध्ये कित्येक निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता आहेत.

Hema Malini post about Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी काय म्हटले ?3 दिवसांनी केली पहिली पोस्ट

(नक्की वाचा: Hema Malini post about Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी काय म्हटले ?3 दिवसांनी केली पहिली पोस्ट)

धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 

सुपरस्टार धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 300-450 कोटी रुपये आहे. त्यांनी 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. जाहिरातींद्वारेही त्यांनी पैसा कमावलाय. लोणावळा येथे त्यांचा 100 एकरवर फार्महाऊस, मुंबईत एक आलिशान बंगला आणि कित्येक आलिशान गाड्याही आहेत. याव्यतिरिक्त एका रेस्टॉरंट व्यवसायातही ते भागीदार होते. अनेक रिअल इस्टेट कंपन्यांशीही त्यांचा संबंध होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com