जाहिरात

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी काय म्हटले ? 3 दिवसांनी केली पहिली पोस्ट

Dharmendra and Hema Malini: धर्मेंद्र हे त्यांच्या तरूणपणात अत्यंत हँडसम होते आणि जगातील सर्वात देखण्या नटांमध्ये त्यांचे नाव घेतले जायचे. हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांनी केलेले चित्रपट गाजले होते.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी काय म्हटले ? 3 दिवसांनी केली पहिली पोस्ट
मुंबई:

Hema Malini post about Dharmendra: प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी हेमा मालिनी यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचून धर्मेंद्र यांचे चाहते भावूक झाले आहेत.  हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचा तरूणपणीचा आणि जोड्याने काढलेला फोटो  शेअर करत धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या भावनांना वाट करून दिली आहे. धर्मेंद्र हे त्यांच्या तरूणपणात अत्यंत हँडसम होते आणि जगातील सर्वात देखण्या नटांमध्ये त्यांचे नाव घेतले जायचे. हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांनी केलेले चित्रपट गाजले होते. मोठ्या पडद्यावर रोमँटीक सीन करता करता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हो त्या दोघांनाही कळाले नव्हते. धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते मात्र त्यानंतरही ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडल्याने आणि या दोघांनी संसार करण्याचा निर्णय घेतल्याने त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती.  

नक्की वाचा: ना सनी ना बॉबी, ICUमधून धर्मेंद्र यांनी या हीरोच्या घरी केला होता फोन; हे झालं शेवटचं बोलणं

धरमजी! माझे सर्वस्व!! हेमा मालिनींची पोस्ट व्हायरल झाली

हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये (Hema Malini post about Dharmendra) म्हटलंय की, "'धरमजी!  माझ्यासाठी खूप काही होते. एक प्रेमळ पती, आमच्या दोन मुली ईशा आणि अहानाचे लाडके वडील, एक मित्र, एक मार्गदर्शक, कवी, प्रत्येक कठीण क्षणात पाठी उभी असलेलं खंबीर व्यक्तिमत्व आणि  माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती.  खरं तर ते माझ्यासाठी सर्व काही होते! आणि ते नेहमी माझ्या चांगल्या आणि वाईट काळात माझ्यासोबत होते. त्यांच्या सहज, मैत्रीपूर्ण वागणुकीने त्यांनी माझ्या कुटुंबातील सगळ्यांना आपलेसे केले होते.  

'त्यांची प्रतिभा, त्यांच्या अंगी असलेला आपुलकीचा भाव यामुळे ते इतरांच्या तुलनेत बरेच वेगळे होते. सगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्वांमध्येही त्यांचे वेगळेपण ठसठशीतपणे दिसायचेय चित्रपटातील त्यांनी कमावलेली लोकप्रियता आणि प्रसिद्धी ही चिरंतन राहील. 

त्यांच्या जाण्याने झालेले माझे वैयक्तिक नुकसान मी  शब्दांत व्यक्त करू शकत नाही  आणि त्यांची उणीव आयुष्यभर जाणवत राहील. अनेक वर्षांच्या एकत्र सहवासानंतर, माझ्यापाशी फक्त त्यांच्या सुंदर आठवणी उरल्या आहेत. "
 

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com