Vinod Khanna First Wife: विनोद खन्ना बॉलिवूड प्रसिद्ध आणि त्यांच्या काळातील सर्वात हँडसम हीरोंपैकी एक होते. 1968 साली विनोद यांनी 'मन के मीत' सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात केली होती. विनोद खन्ना यांना पहिल्या सिनेमाची संधी सुनील दत्त यांच्यामुळे मिळाली होती. यानंतर त्यांनी कित्येक सिनेमांमध्ये काम केले आणि 1971 पर्यंत विनोद खन्ना बॉलिवूडमधील टॉप स्टार देखील बनले होते.
विनोद खन्ना यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो व्हायरल (Vinod Khanna First Marriage Photo Viral)
एक काळ असाही होता जेव्हा लोकप्रियतेच्या बाबतीत ते सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही टक्कर देऊ लागले होते. सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी 1971मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये विनोद खन्ना, त्यांची पत्नी गीतांजली (Vinod Khanna First Wife), अभिनेते धर्मेंद्र आणि सुनील दत्त दिसत आहेत.
गीतांजली (Vinod Khanna First Wife) या विनोद खन्ना यांच्या पहिल्या पत्नी आहेत. 53 वर्षांपूर्वी झालेल्या या लग्नसोहळ्यामध्ये सिनेसृष्टीतील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. कधीही न पाहिलेले फोटो देखील पाहायला मिळत आहेत. यापैकीच एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल झालाय, ज्यामध्ये अभिनेता विनोद खन्ना, त्यांच्या पत्नीसोबत तरुण बोस देखील दिसत आहे.
(नक्की वाचा: Anushka Sharma: अनुष्का शर्माचे बालपणाचे 10 Unseen क्युट फोटो, 5व्या फोटोने विराट कोहलीलाही लावलं होतं वेड)
कोण आहेत तरुण बोस?
तरुण बोस यांनी 1957मध्ये असित सेन यांचा अपराधी कौन? (1957) सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये माला सिन्हा आणि अभी भट्टाचार्य हे देखील होते. बिमल रॉय यांच्या सुजाता (1959) सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. यानंतर त्यांनी गुमनाम, बंदिनी (1963), अनुपमा (1966), देवर, मुझे जीने दो (1963), आन मिलो सजना यासह कित्येक सिनेमांमध्ये दमदार अभिनय साकारला होता.
(नक्की वाचा: Aishwarya Rai News: ऐश्वर्या रायचे कधीही न पाहिलेले 10 फोटो, सर्वांमध्ये दिसतेय आईचीच छबी)
तरुण यांनी अशोक कुमार, धर्मेंद्र, मनोज कुमार, सुनील दत्त, बलराज साहनी आणि अमिताभ बच्चन यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलंय. 8 मार्च 1972 रोजी तरुण बोस यांनी जगाचा निरोप घेतला.