
Anushka Sharma Childhood Photos: एकेकाळी अनुष्का शर्माचाही बॉलिवूडमधील टॉप 10 अभिनेत्रींच्या यादीमध्ये समावेश केला जात असे. यानंतर तिने निर्मिती क्षेत्रामध्येही पाऊल ठेवले होते. दरम्यान बऱ्याच वर्षांपासून अनुष्का मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 1 मे 1988 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरामध्ये अनुष्काचा जन्म झाला. अनुष्काने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली आणि यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच तिने सिनेरसिकांच्या मनामध्ये हक्काची जागा निर्माण केली.
अनुष्काने 2008 साली यशराज फिल्म्सच्या "रब ने बना दी जोडी" सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. तिचा पहिला सिनेमाच बादशाह शाहरुख खानसोबत होता. सिनेमातील तिच्या साध्या लुकने आणि दमदार अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकलं.

यानंतर "बँड बाजा बारात" (2010) सिनेमातील तिची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली की आजही टेलिव्हिजन चॅनेलवर सिनेमा लागला तर प्रेक्षक आवडीने पाहतात. अनुष्काने रोमँटिक, ड्रामा आणि थ्रिलर यासारख्या वेगवेगळ्या सिनेमांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.
(नक्की वाचा: Anushka Sharma Birthday: विराट कोहलीची पत्नी अनुष्कासाठी खास पोस्ट)

'एनएच 10', 'सुलतान', 'झीरो' आणि 'परी' यासारख्या सिनेमांमध्ये तिने कामही केलंय आणि काही सिनेमांची निर्मितीही केलीय.

अनुष्काने भाऊ कार्नेश शर्मासोबत मिळून "क्लीन स्लेट फिल्म्स" (Clean Slate Filmz) नावाच्या प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली. या बॅनरअंतर्गत तिने 'एनएच10', 'फिल्लौरी'आणि 'परी' यासारख्या अनोखी कहाणी असणाऱ्या सिनेमांची निर्मिती केली.
(नक्की वाचा: विराट कोहलीचा मोठा भाऊ पाहिला का? सांभाळतोय त्याच्या कोट्यवधींच्या बिझनेसचे साम्राज्य)

खासगी आयुष्याबाबत सांगायचे झाले तर अनुष्का शर्माने 2017मध्ये क्रिकेटर विराट कोहलीसोबत इटलीमध्ये लग्न केले होते.

अनुष्का आणि विराटच्या लग्नसोहळ्यामध्ये खास मित्रपरिवार आणि सदस्यांचा समावेश होता. यानंतर दोघांनी मुंबई तसेच दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टीही दिली होती.

अनुष्का-विराटला वामिका आणि अकाय अशी दोन अपत्य आहेत. हे जोडपं त्यांच्या मुलांना प्रसिद्धी माध्यमापासून कायम दूर ठेवतात.

अनुष्का शर्मा शेवटी शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत झीरो सिनेमामध्ये झळकली होती.

सध्या ती चकदा एक्सप्रेस सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे, हा तिचा कमबॅक सिनेमा आहे.


फिल्मफेअर, आयफा यासह कित्येक पुरस्कारांनी अनुष्काचा गौरव करण्यात आलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world