जाहिरात

Salman Khan: सलमानचा गेल्या 8 वर्षात एक ही हीट चित्रपट नाही, 'हा' आहे शेवटचा ब्लॉकबास्टर

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या आठ वर्षांपासून सलमान खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेले नाहीत.

Salman Khan: सलमानचा गेल्या 8 वर्षात एक ही हीट चित्रपट नाही, 'हा' आहे शेवटचा ब्लॉकबास्टर
मुंबई:

कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालण्यासाठी सलमान खानचे नावच पुरेसे आहे. पण या मोठ्या नावाचा सलमान खानच्या चित्रपटांना कधी कधी फटकाही बसतो. अनेकदा असे म्हटले जाते की सलमान खानचे वाईट  चित्रपटही चांगली कमाई करतात. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून सलमान खानचे चित्रपट रिलीज होत आहेत, ते शंभर कोटींच्या क्लबमध्ये  सहज पोहोचतात. पण बॉक्स ऑफिसवर त्यांची कामगिरी कमजोर ठरताना पाहायला मिळते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या आठ वर्षांपासून सलमान खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेले नाहीत. त्याचा शेवटच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे नाव होते 'टायगर जिंदा है. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ होती. सलमान खानचा हा चित्रपट 'एक था टायगर' चित्रपटाचा सिक्वेल होता. ज्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते.

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

पण 'टायगर जिंदा है' नंतर सलमान खानचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला नाही. आयएमडीबीच्या लिस्टनुसार सलमान खानचा 'रेस 3' 2018 मध्ये रिलीज झाला. हा हिट चित्रपट होता, पण ब्लॉकबस्टर ठरला नाही. 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'भारत'चीही तीच अवस्था होती. दबंग चित्रपटाचा सिक्वेल 'दबंग 3' बॉक्स ऑफिसवर तेवढा यशस्वी ठरला नाही.  

ट्रेंडिंग बातमी - Operation sindoor: विश्व युद्धापासून भारत-पाक तणावापर्यंत, अनेकांचे प्राण वाचवणार्‍या सायरनचा इतिहास आहे खास

'दबंग' चित्रपट सलमान खानच्या चाहत्यांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. 2023 मध्ये सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट वाईट पद्धतीने आपटला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. टायगर फ्रँचायझीचा तिसरा भाग म्हणजेच 'टायगर 3'लाही जास्त प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपटाने सरासरी कमाई केली. अलीकडेच रिलीज झालेला सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपटही फ्लॉप ठरला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com