जाहिरात

Operation sindoor: विश्व युद्धापासून भारत-पाक तणावापर्यंत, अनेकांचे प्राण वाचवणार्‍या सायरनचा इतिहास आहे खास

सायरन ऐकल्यावर तुम्हाला काय करायचे आहे हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. शिवाय ही सायरन प्रणाली कधी सुरू झाली याची ही माहिती देणार आहोत.

Operation sindoor: विश्व युद्धापासून भारत-पाक तणावापर्यंत, अनेकांचे प्राण वाचवणार्‍या सायरनचा इतिहास आहे खास

जम्मूमध्ये रात्रीच्या शांततेच्या वेळी केवळ दोन गोष्टी सर्वांच्या लक्षात राहील्या. एक आकाशात पाकिस्तानचे नष्ट होत असलेले ड्रोन आणि दुसरे जमिनीवर वाजणारे सायरन. 8 आणि 9 मे च्या रात्री हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनचा आवाज जम्मू-काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये ऐकू आला. या सायरनच्या आवाजाने दोन गोष्टी होत होत्या. संपूर्ण भागातील वीज बंद होत होती. लोकांनी आपापल्या घरात अंधार केला होता. संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. दुसरे काम म्हणजे सर्व लोक छताखाली किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत होते. चला तर मग, सायरन ऐकल्यावर तुम्हाला काय करायचे आहे हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. शिवाय ही सायरन प्रणाली कधी सुरू झाली याची ही माहिती देणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सायरन ऐकल्यावर तुम्हाला काय करायचे आहे?
सायरन म्हणजे धोक्याची घंटा. पाकिस्तानसोबतचा तणाव शिगेला पोहोचला आहे. सरकार सायरनचा वापर रेड अलर्ट जारी करण्यासाठी करत आहे. जसा सायरन वाजेल, तसे तुम्ही आपापल्या घरात किंवा कोणत्याही छताखाली या आणि सर्व प्रकारची लाईट बंद करा. प्रशासनाकडून वीज कापली जाईल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला ब्लॅकआउट दरम्यान इन्व्हर्टर आणि जनरेटरची लाईटसुद्धा चालू ठेवायची नाही.

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

युद्धात धोक्याचा संकेत कसा बनला सायरन?
1937 मध्ये जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले. तेव्हा धोक्याच्या इशाऱ्याच्या रूपात सायरनचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. सायरन बनवणारी जर्मनीची कंपनी हर्मन ग्रूपच्या रिपोर्टनुसार, या युद्धात जर्मनीमध्ये जवळपास 11,000 सायरन वाजवून जनतेला हवाई हल्ल्याचा इशारा दिला जात होता. या कामाव्यतिरिक्त या सायरनचा इतर कुठेही वापर करण्याची परवानगी नव्हती. त्यांचा वापर केवळ हवाई हल्ल्याच्या धोक्याच्या इशाऱ्यासाठी आणि धोका टळल्यानंतर ऑल-क्लिअर सांगण्यासाठी केला जाऊ शकत होता.

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: दाऊद इब्राहिम भारताच्या एअर स्ट्राईकमुळे घाबरला, कराचीतून सहपरिवार पळाला

सायरन युद्ध काळात महत्वाचे 
खरं तर या दुसऱ्या महायुद्धानंतर सायरनने आपले महत्त्व गमावले होते. पण ते फक्त थोड्या काळासाठीच. जसे अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये शीतयुद्ध सुरू झाले, तसे त्याचे महत्त्व पुन्हा वाढले. अणुबॉम्ब हल्ल्याच्या भीतीने सरकारं नागरी संरक्षणाबाबत अधिक गंभीर झाली. मोठे-मोठे टॉवर बनवून सायरन त्यांच्यावर लावले जाऊ लागले. तेव्हापासून ते आजतागायत आहेत.  मग ते इस्त्राईल-गाझा युद्ध असो किंवा रशिया-युक्रेन युद्ध, या सायरनचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्याच्या स्थितीत रेड अलर्ट जारी करण्यासाठी केला जातो.

ट्रेंडिंग बातमी - Kalyan News: 11 वर्षाच्या मुलीवर रात्रभर अत्याचार, दुकानात कोंडून केले भयंकर कृत्य

सावध करण्यासाठी सायरन 
सायरन वाजल्यानंतर मजबूत बांधकामात आश्रय घेणे अधिक चांगले आहे.  ज्याला खिडक्या नाहीत अशा खोल्या जसे की बाथरूम, स्टोअर रूम किंवा जिन्याखालील जागेला प्राधान्य द्या. शक्य असल्यास तळघर किंवा भुयारी मार्गाचा वापर करा. जमिनीवर झोपून घ्या, आपले डोके आणि मान झाका, स्फोटाचा आवाज ऐकू आल्यास त्वरित जमिनीवर झोपून घ्या आणि आपले डोके व मान हाताने किंवा कोणत्याही वस्तूने झाका. वीज, गॅस आणि पाण्याची सप्लाई बंद करा. आग आणि इतर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी मेन स्विचमधून सर्व सप्लाई बंद करा. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com