Bollywood News: ज्या हॉटेलमध्ये वडील होते वेटर, तेच विकत घेऊन सुपरस्टारने बाबांना दिलं गिफ्ट; नेटवर्थ ऐकून बसेल धक्का

Bollywood News: ज्या हॉटेलमध्ये बाबांनी वेटर म्हणून काम केले, तेच हॉटेल विकत घेऊन सुपरस्टारने बाबांना गिफ्ट केले. या सुपरस्टारच्या नावाचा अब्जाधीशांच्या यादीमध्ये समावेश केला जातो.

जाहिरात
Read Time: 2 mins
या मुलाला तुम्ही ओळखता का?

Bollywood News: बॉलिवूडमध्ये असे कित्येक सुपरस्टार झाले असतील, ज्यांनी मेहनतीने स्वतःचे नाव कमावले आणि जगभरात प्रसिद्धी मिळवली. असाच एक स्टार म्हणजे सुनील शेट्टी (Sunil Shetty), जो बॉलिवूडचा अण्णा या नावानेही ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये (Bollywood News) एण्ट्री करण्यापूर्वी सुनील शेट्टीने प्रचंड संघर्ष केलाय आणि त्याच्यापेक्षाही त्याच्या वडिलांनी अधिक संघर्ष केला आहे. सुनीलचे वडील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते. सुनील शेट्टीने एका मुलाखतीत स्वतः वडिलांच्या संघर्षाची कहाणी सांगितली. दरम्यान सुनीलने देखील कष्टाने स्वतःचे नाव कमावले आणि नंतर एकेकाळी वडिलांनी ज्या हॉटेलमध्ये काम केले तेच हॉटेल विकत घेऊन बाबांना गिफ्ट केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वर्ष 2013 मध्ये आपल्या डेकोरेशन शोरूमच्या लाँचिंगदरम्यान सुनील शेट्टीने (Suniel Shetty) सांगितले होते की, हे तेच हॉटेल आहे जेथे कधीकाळी माझे वडील काम करत होते. "माझे वडील वीरप्पा शेट्टी येथे वेटर म्हणून काम करते होते. खूप संघर्ष केल्यानंतर वर्ष 1943 मध्ये त्यांनी वरळीतील फोर सीझन्स हॉटेलच्या शेजारी असलेली एक संपूर्ण इमारत विकत घेतली", असेही सुनील शेट्टीने सांगितलं होते. 

Advertisement

(नक्की वाचा: माधुरी दीक्षितच्या गाण्यावर तरुणींनी धबधब्याखाली केला डान्स, VIDEO पाहून विसराल अभिनेत्रीचा डान्स)

सुनीलने पुढे असेही म्हटले की,"वडिलांनी त्यांच्या जीवनात खूप संघर्ष केला होता आणि स्वतःची ओळख निर्माण केली, म्हणूनच माझ्यासाठी माझे वडील रिअल हीरो आहेत. कोणतेही काम करण्यासाठी त्यांनी कधीही लाज बाळगली नाही. मला देखील त्यांनी तिच शिकवण दिली".

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)

सुनील शेट्टीचे नेटवर्थ

सुनील शेट्टी एक सिनेनिर्माताही आहे. स्वतःचे प्रोडक्शन हाऊस 'पॉपकॉर्न एंटरटेनमेंट'बॅनर अंतर्गत त्याने कित्येक सिनेमांची निर्मिती केलीय. तसेच तो 'बार अँड क्लब'व्यतिरिक्त अन्य कित्येक रेस्टॉरंट आणि हॉटेलचा मालक आहे. सुनील शेट्टीची एकूण संपत्ती जवळपास 125 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे.