Bollywood News: बॉक्स ऑफिसवरील चढउतार आणि ट्रेंडनुसार बदलणारे स्वरुप पाहता आताच्या युगामध्ये सिनेमांसाठी विमा काढणे निर्मात्यांसाठी सामान्य बाब आहे. पण भारतामध्ये सिनेमासाठी विमा काढण्याचा ट्रेंड कोणी सुरू केला, हे तुम्हाला माहीत आहे का? बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांनी हा ट्रेंड सुरू केला. वर्ष 1999मध्ये बॉक्सऑफिसवर 'ताल' सिनेमा झळकला होता. घई यांनीच सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. इतकेच नव्हे तर या ब्लॉकबस्टर सिनेमासाठी त्यांनी युनायडेट इन्शुरन्स कंपनीकडून 11 कोटी रुपयांचा विमा काढला होता. घई यांच्या निर्णयामुळे 'ताल' हा विमा काढण्यात आलेला पहिला भारतीय सिनेमा ठरला. सिनेमामध्ये अनिल कपूरसह अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिनेता अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या म्युझिकल रोमँटिक ड्रामा सिनेमाचे प्रेक्षक तसेच समीक्षकांनी भरभरून कौतुक केले.
(नक्की वाचा: विकी-विद्याचा तो वाला व्हिडीओ पाहिला का? Rajkummar Rao आणि Tripti Dimriचा रोमान्स)
1999मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
'ताल' सिनेमाचे बजेट तब्बल 11 कोटी रुपये इतके होते आणि या सिनेमाने भारतामध्ये 22 कोटी रुपयांची तर जगभरात 55 कोटी रुपयांची कमाई केली. 'हम साथ-साथ हैं', 'बीवी नंबर 1' आणि 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमानंतर वर्ष 1999मधील 'ताल' हा देखील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
(नक्की वाचा: हे बेबी फेम क्युट Angel 17 वर्षांनंतर दिसते अशी, गालावरच्या खळीवर चाहते फिदा)
आजची पिढीही गाण्यांच्या प्रेमात
'ताल' सिनेमातील गाणी आजही सिनेरसिकांच्या लक्षात आहेत. संगीत दिग्दर्शक व गायक ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेली आणि आनंद बक्षी यांनी लिहिलेली गाणी सदाबहार आहेत. 'इश्क बिना', 'रमता जोगी', 'मेरे पास है तू', 'ताल से ताल' आणि 'नी मैं समज' या गाण्यांनी आजच्या पिढीलाही वेड लावले आहे.
(नक्की वाचा: सुपरस्टार रितेश देशमुख म्हणाला - NDTV मराठी लय भारी)
सिनेमाचे नाव कसे ठरले?
सिनेमातील गाण्याच्या लाँचदरम्यान निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांनी म्हटले होते की, "सिनेमाच्या नावाचे श्रेय मी ए.आर. रेहमान यांना देतो. हा एक रोमँटिक चित्रपट आहे आणि मी यास कोणतेही नाव देऊ शकलो असतो - दिल, प्यार, हम भाग गए; पण या सिनेमात रेहमान यांचा सहभाग होता. ज्यामुळे मला सिनेमाला 'ताल' नाव देण्याचा आत्मविश्वास मिळाला. संपूर्ण श्रेय ए.आर. रेहमान आणि आनंद बक्षी यांचे आहे. गाणी ऐकल्यानंतर मला जाणवले की सिनेमासाठी ज्या-ज्या अडचणी स्वीकारल्या, त्या यशस्वी झाल्या आहेत".
'ताल' सिनेमामुळे वर्ष 2000मध्ये अनिल कपूर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, ए.आर. रेहमान यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, आनंद बक्षी यांना 'इश्क बिना' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार, अलका याज्ञिक यांना 'ताल से ताल' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.